The Taj Story: ताजमहाल मंदिराच्या जागी बांधलाय? परेश रावल यांच्या चित्रपटातील कथा कल्पनिक की सत्य!

Shruti Vilas Kadam

चित्रपटाचा विषय आणि वाद

‘द ताज स्टोरी’ या चित्रपटात दाखवले आहे की ताजमहल एका मंदिराच्या जागी बांधला गेला असावा. या कल्पनेमुळेच चित्रपटावर धार्मिक आणि ऐतिहासिक वाद उद्भवले आहेत.

The Taj Story

चित्रपटाची कथा

कथानक एक कोर्टरूम ड्रामा आहे. यात टूर गाईड विष्णुदास (परेश रावल) ताजमहलबद्दल सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा पात्र अनवर राशिद या दाव्याचा विरोध करतो. दोघांमधील वादातून अनेक ऐतिहासिक प्रश्न उपस्थित होतात.

The Taj Story

दिग्दर्शकांचा दृष्टिकोन

चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल यांनी स्पष्ट केले आहे की ही कथा कल्पना आणि श्रद्धेच्या सीमेवर आधारित आहे. ती कोणत्याही धर्माला टार्गेट करत नाही. तर विचार करायला लावणारी आहे.

The Taj Story

"मंदिर होता का?" या प्रश्नाचे उत्तर

अभिनेता परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितले की “आम्ही निश्चितपणे म्हणत नाही की ताजमहल मंदिर आहे. हा चित्रपट एखाद्या दावा नाही, तर विचार आहेत.”

The Taj Story

इतिहास आणि पुरावे

चित्रपटात असे दाखवले आहे की काही इतिहासकारांच्या मते ताजमहल बांधण्यापूर्वी त्या जागी दुसरे स्थापत्य होते. मात्र चित्रपट स्वतः त्या गोष्टीला अंतिम सत्य मानत नाही. तो केवळ शंका आणि संशोधनाचा दृष्टिकोन दाखवतो.

The Taj Story

प्रेम आणि स्थापत्याचा प्रश्न

चित्रपट ताजमहलाला केवळ प्रेमाचे प्रतीक म्हणून न पाहता, त्याच्या मागील वास्तुशास्त्र, कलाकार, आणि इतिहास याबद्दल प्रश्न उपस्थित करतो “खरं प्रेम कोणाचं होतं, आणि कोण विसरलं गेलं?”

The Taj Story

वाद आणि समाजातील प्रतिक्रिया

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. काहींनी हा प्रयत्न इतिहासाला बदमान करण्याचा असल्याचे म्हटले, तर काहींनी “कल्पनाशक्ती आणि स्वातंत्र्य” म्हणून त्याचे समर्थन केले.

taj mahal | canva

मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार 'बीच वेडिंग', समर-स्वानंदीच्या नात्याची नवी सुरुवात

Veen Doghantali Hi Tutena
येथे क्लिक करा