Jammu and Kashmir Police arrest Dr. Asmat Shakil, sister of Delhi blast suspect Mujammil Shakil; Bangladesh link under investigation. saam tv
देश विदेश

Delhi Blast: जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई; संशयित आरोपी मुजम्मिलच्या बहिणीला अटक, दिल्ली स्फोटाचं बांगलादेश कनेक्शन

Delhi Blast Bangladesh connection: डॉ. मुजम्मिलची शकील घनी यांची बहीण डॉ. असमत शकील हिने जानेवारी २०२५ मध्ये बांगलादेशमधून एमबीबीएस पूर्ण केले. तरतिचे वडील पुलवामा येथील आहेत.

Bharat Jadhav

  • दिल्ली स्फोट प्रकरणात जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई.

  • आरोपी मुजम्मिल शकील घनी यांची बहीण अस्मत शकील यांना अटक

  • या दिल्ली स्फोट प्रकरणात जैश-ए-मोहम्मद आणि एजीयूएच मॉड्यूलचा सहभाग असल्याचा संशय आहे.

दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणाचा तपासाची चक्रे जोरात फिरत आहेत. तपास यंत्रणा दिल्लीसह देशभरात या घटनेबात पुरावे शोधत आहे. याप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत डॉ. मुजम्मिल शकील घनी यांची बहीण डॉ. अस्मत शकील यांना ताब्यात घेतलंय. तीस वर्षीय अस्मत शकीलने जानेवरी २०२५ मध्ये बांग्लादेशातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय. त्यांच्या वडिवांचे नाव शकील असून ते पुलवामा येथील राहणारे आहेत.

दरम्यान डॉ. मुजम्मिलला जैश-ए-मोहम्मद आणि एजीयूएच दहशतवादी मॉड्यूलमध्ये आधीच अटक करण्यात आली आहे.

२६ जानेवारी आधीच घडवायचा होता स्फोट

दिल्लीतील कार स्फोटाप्रकरणी करण्यात येणाऱ्या तपासात पोलिसांनी डॉ. मुजम्मिल शकील घनी यांच्या मोबाईल फोनचा डेटा तपासला. यात त्याने यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसराची अनेकवेळा रेकी केली होती. त्याने २६ जानेवारी रोजी दिल्लीमधील लाल किल्ल्याला हल्ला घडवण्याचा कट आखला होता, असाही पोलिसांना संशय आहे. परंतु त्यावेळी परिसरात गस्त जास्त असल्याने त्याचा डाव अयशस्वी झाला.

डॉ. मुजम्मिल यांनी त्याचा सहकारी डॉ. उमर नबी यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आणि गर्दीच्या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी अनेकवेळा लाल किल्ल्याला भेट दिली होती. टॉवर लोकेशन डेटा आणि आजूबाजूच्या भागातून गोळा केलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्या दोघांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्यात.

अनेक राज्यात तपास सुरू

जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झालाय. यात तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आलीय. दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ एका धावत्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात १२ जणांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला. यात साधारण २५०० किलोग्रॅमचा अमोनियम नायट्रेट, पोटेशिअम क्लोरेट आणि सल्फर जप्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT