Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

Delhi Blast Case : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयितांकडे हुंडाई आय२० व्यतिरिक्त आणखी एक कार असल्याची बाब तपासातून उघड झाली आहे.
Delhi Blast Case
Delhi police trace second car linked to blast suspects; EcoSport registered under Umar Un Nabi under investigation.saam tv
Published On
Summary
  • दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक कारचा शोध घेतला जात आहे.

  • उमर उन नबी यांच्या नावावर या कारची नोंदणी आहे.

  • पोलिसांनी दिल्लीतील सर्व चेकपॉईंटवर सतर्कतेचे आदेश दिलेत.

दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणी तपास करणाऱ्या तपास यंत्रणेच्या हाती अजून एक महत्त्वाचा पुरवा लागलाय. स्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींकडे हुंडाई आय२० व्यक्तीरिक्त अजून एक कार होती. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्लीमधील सर्व पोलीस स्टेशन आणि चेकपाईंटसवरील पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. DL10CK0458 या कारची नोंदणी तपशील उमर उन नबी यांच्या नावावर आहे. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी पासून त्यांच्या नावावर आहे, अशी माहिती राजौरी गार्डन आरटीओकडून देण्यात आलीय.

Delhi Blast Case
Accident: आणखी एक भयंकर स्फोट! महामार्गावर ट्रक उलटला, सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला; पाहा थरारक VIDEO

दिल्ली पोलिसांनी सर्व टीमला लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार शोधण्याचे निर्देश दिलेत. पाच पथके आता शहराच्या विविध भागात कारचा शोध घेत आहेत. यासह उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांना याबाबत अलर्ट देण्यात आलाय. शहरांमधील टोल नाक्यावरून कारची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याबाबत पुरावे गोळा केली जात आहेत.

Delhi Blast Case
Delhi Blast Video: दिल्ली स्फोटाचा पहिला VIDEO; लाल किल्ल्याजवळ सिग्नलवर कार आली अन् क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना कोणत्याही लाल रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्टला थांबवून त्याचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तर DL10CK0458 क्रमांकाची कार दिसेल तर तिला ताबडतोब थांबवून कार जप्त करण्याचे निर्देश देण्यात आलेत. याचदरम्यान फरीदाबादमधील २९ ऑक्टोबरचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. हे फुटेज पेट्रोल पंपजवळील आहे. यात एक कार दिसत आहे.

कार चालक पीयूसी चेक करत होता. त्या कारमध्ये तीनजण दिसत आहेत. तपास यंत्रणेने दावा केलाय की, उमर आणि तारिक हे स्वत: पीयूसी चेक करण्यासाठी गेले होते. फुटेजच्या एक मिनिट पाच सेकंदाचा वेळ झाल्यानंतर दोन पुरूष बॅगा घेऊन जाताना दिसतात. त्यांची ओळख उमर आणि तारिक अशी आहे. पोलीस आता त्यांच्या संपूर्ण हालचालींची चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी रॉयल कार झोनच्या मालकाला ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com