Who Will Be Delhi Chief Minister: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळालाय. आता मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सर्वत्र होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचा पुढचा मुख्यमंत्री विजयी आमदारांपैकीच असणार आहे. भाजप यावेळी एका महिला आमदाराची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करू शकते, असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे साहिब सिंग वर्मा, विजेंद्र गुप्ता आणि सतीश उपाध्याय या नावांचीही चर्चा होतेय. तर राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार मुख्यमंत्रीपद महिला आमदारालाही दिली जाऊ शकते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकून सत्तेची चावी मिळवलीय. भाजपने दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवली होती. अशा स्थितीत निवडणूक जिंकल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आता जोरात सुरूय. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री नवनिर्वाचित ४८ आमदारांमधून निवडला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला आमदाराला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिली जाऊ शकते.
दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री आमदारच होणार आहे. म्हणजे कोणत्या खासदाराला सीएमच्या गादीवर बसवलं जाणार नाहीये. मंत्रिमंडळात महिला आणि दलित समाजाच्या प्रतिनिधित्वालाही प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे समाजातील सर्व घटकांचा विचार केला जाईल. दरम्यान महिला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चार महिला आमदारांच्या नावाची चर्चा आहे. यावेळी भाजपच्या चार महिला उमेदवार आमदार झाल्या आहेत. यामध्ये रेखा गुप्ता, शिखा राय, पूनम शर्मा आणि नीलम पहेलवान यांच्या नावांचा समावेश आहे.
रेखा गुप्ता शालिमार बागमधून, शिखा रॉय ग्रेटर कैलाशमधून, पूनम शर्मा वाजीपूरमधून आणि नीलम पहेलवान नजफगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 48 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी 4 महिला उमेदवार विजयी झाल्यात. या महिलांमध्ये शालिमार बागेतील रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर आहे, त्यांना ६८,२०० मते मिळाली आहेत. वजीरपूरमधून पुनम गुप्ता यांचेही नाव पुढे आले असून त्यांना ५४,७२१ मते मिळाली आहेत.
याशिवाय नजफगढमधील नीलम पहेलवान यांना १,०१,७०८ मते मिळाली आहेत. सीएमच्या शर्यतीत ग्रेटर कैलाशमधून ४९,५९४ मते मिळविणाऱ्या शिखा रॉय यांचेही नाव आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची याबाबत बैठक झालीय. आ बैठकीत दिल्ली सरकारच्या स्वरूपावर चर्चा झाली. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजप सरकार स्थापनेचा दावा करेल असं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.