DELHI ASSEMBLY CHAOS: AAP-BJP MLAS CLASH, FIVE MEMBERS MARSHALLED OUT saam tv
देश विदेश

विधानसभेत भाजप अन् विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावले; 5 आमदारांना सभागृहातून बाहेर काढलं

Chaos in Delhi Assembly: दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पार्टी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार वाद झाला. हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पाच आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं.

Omkar Sonawane

दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी सभागृहात जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. आम आदमी पार्टीचे आमदार कुलदीप कुमार आणि भाजपचे आमदार रवी नेगी हे आपल्या जागांवरून उठून सामोरा आले. दोन्ही नेत्यांमध्ये सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक झाली, यामुळे काही काळ सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. सभागृहात उपस्थित इतर आमदार आणि अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांना शांत करण्यात आले. मात्र, या राड्यामुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन आमदार सभागृहात जवळपास एकमेकांवर हमरी तुमरी करत थेट हाणामारीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे काहीवेळ सभागृहात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारावर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आपचे आमदार कुलदीप कुमार आणि भाजपचे आमदार रवि नेगी आपल्या जागेवरून एकमेकांवर जोरदार प्रहार करत होते. अचानक दोघेही उभे राहिले, मोठ्याने ओरडू लागले आणि एकमेकांच्या अंगावर धावले. त्याच वेळी दोन्ही पक्षांचे काही आमदार पळत आले मध्ये पडले आणि दोघांना वेगळं केलं. परिस्थिती आणखी चिघळण्याआधीच दोन्ही आमदारांना शांत केले.

सभापती विजेंद्र गुप्ता या प्रकारामुळे संतप्त झाले. त्यांनी हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि असंसदीय असल्याचं म्हटलं. त्यांनी इशारा दिला की, मी कडक कारवाई करू शकतो. कोणताही सदस्य आपली जागा सोडून जाणार नाही. अपशब्द सहन केले जाणार नाहीत. परवानगीशिवाय बोलणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल. सभागृहाच्या मर्यादेचा भंग होऊ दिला जाणार नाही.

नेमके काय घडले?

हा वाद अधिक चिघळला तो बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यावर टीका केल्यानंतर. त्यांनी म्हटलं की, आतिशी या अधिवेशन सोडून गोव्याला फिरायला गेल्या आहेत. तीन दिवसांचं हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार असून, सरकारकडून तीन विधेयकं मांडली जाणार आहेत आणि CAG च्या तीन अहवालांना सभागृहात सादर केलं जाणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशीच्या या गोंधळामुळे अधिवेशनाचं वातावरण तणावपूर्ण झालं आहे.

यानंतर विरोधकांकडून सतत गोंधळ घातल्यामुळे सभापतींनी आपचे आमदार संजीव झा, कुलदीप कुमार, विशेष रवि, जरनैल सिंह आणि सोमदत्त यांना मार्शलमार्फत सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. गोंधळ थांबला नाही, उलट वाढतच गेला आणि अखेर सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

६५० कोटींच्या मेडिकल घोटाळ्याचा आरोप

दरम्यान, सभागृहाबाहेरही आपच्या आमदारांनी ओआरएसच्या पॅकेट्सची माळ घालून आंदोलन केलं. दिल्लीमध्ये ६५० कोटी रुपयांच्या कथित मेडिकल घोटाळ्याचा आरोप करत त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मन नदीत बैलगाडी उलटून भीषण दुर्घटना; २८ वर्षीय तरुण बेपत्ता, चार बैलांचा मृत्यू

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय! रोज एक ग्लास कारल्याचा रस प्या

Kidney Stone Diet: किडनी स्टोनचा त्रास आहे? आहारात 'हे' ७ पदार्थ घ्या; मिळेल 2 आठवड्यात आराम

रडल्याने शरीरावर काय परिणाम होतो? आश्चर्यकारक 5 फायदे तुम्हाला माहित आहे का?

'दृश्यम'पेक्षाही भयंकर! पतीला गुंगीचं औषध, बॅटने मारहाण अन् घरातच सिमेंटचा कट्टा... त्या' एका कॉलने उलगडलं मोठं रहस्य

SCROLL FOR NEXT