8th Pay Commission : 3.83 किंवा 4.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती वाढेल पगार? जाणून घ्या गणित

Fitment Factor : ३.८३ किंवा ४.० फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात किती वाढ होईल, ५६,१०० आणि ३५,४०० बेसिक पेचे गणित जाणून घ्या.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा फिटमेंट फॅक्टरची आहे. कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांकडून ३.८३ आणि ४.० फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. मात्र आठव्या वेतन आयोगाने अद्याप कोणताही अंतिम फिटमेंट फॅक्टर निश्चित केलेला नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले हे आकडे फक्त प्रस्ताव आणि अंदाज आहेत.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या बेसिक पेचे नव्या वेतनरचनेतील बेसिक पेमध्ये रुपांतर करण्यासाठी वापरला जाणारा गुणक असतो. सहाव्या वेतन आयोगात १.८६, तर सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट लागू करण्यात आला होता.

8th Pay Commission
Eyebrow Tips : आयब्रो पेन्सिल घेताना 'या' ८ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; पातळ भुवयांवरही मिळेल इन्स्टंट ग्लॅमरस लुक

५६१०० बेसिक पे असेल तर गणित काय?

३.८३ फिटमेंट फॅक्टरनुसार ५६१०० × ३.८३ = २,१४,८६३ इतका अंदाजे नवीन बेसिक पे होऊ शकतो. तर ४.० फिटमेंट फॅक्टरनुसार तो २,२४,४०० होईल. म्हणजेच दोन्ही प्रस्तावांमध्ये सुमारे ९,५३७ इतका फरक पडतो.

8th Pay Commission
Chanakya Niti : या ५ गोष्टी बायकोला सांगितल्याने तुटेल नातं, चाणक्यांचा महत्त्वाचा सल्ला

३५,४०० बेसिक पेवर किती वाढ?

३.८३ नुसार नवीन बेसिक पे १,३५,५८२ रुपये , तर ४.० नुसार १,४१,६०० होईल. या दोन आकड्यांमध्ये ६,०१८ इतका फरक आहे. मात्र, हे अंतिम वेतन समजू नये. कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष मासिक पगार फक्त फिटमेंट फॅक्टरवर ठरत नाही.DA, HRA,ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि भत्तेही महत्त्वाचे असतात.

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोग स्थापन केला. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मे-जून २०२७ च्या आसपास अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र सरकार शिफारशींचा विचार करून अंतिम निर्णय घेईल.

त्यामुळे सध्या ३.८३ किंवा ४.० फिटमेंट फॅक्टरच्या आधारे दिसणारे पगाराचे आकडे हे फक्त अंदाज आहेत. अंतिम निर्णयानंतरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक आणि एकूण पगारात नेमकी किती वाढ होईल, हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com