Rahul Gandhi : राहुल गांधींनी सांगितले भाजपमधील आवडत्या नेत्याचे नाव; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण

Rahul Gandhi, Captain Amarinder Singh : इन्स्टाग्रामवरील 'Ask Me Anything' सत्रात राहुल गांधी यांनी भाजपमधील आपला आवडता नेता म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
Rahul Gandhi favourite BJP leader name
Rahul Gandhi favourite BJP leader name Saam TV marathi
Published On

Rahul Gandhi favourite BJP leader name : काँग्रेसने खासदार आणि विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपमधील आवडत्या नेत्याचं नाव सांगितलेय. इंस्टाग्रामवर युवा पिढीशी (Gen Z) संवाद साधताना राहुल गांधी यांना “भाजपामधील तुमचा सर्वात आवडता नेता कोणता?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर राहुल गांधी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले. राहुल गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राहुल गांधी यांनी तरूणांसोबत संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' (Ask Me Anything) सत्र सुरू केले आहे. गुरूवारी त्यांनी तरूणांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थी आंदोलने, महिला शिक्षण, राजकारण आणि बॅटमॅनसारख्या विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. याच संवादावेळी राहुल गांधी यांना “भाजपामधील तुमचा सर्वात आवडता नेता कोणता?” असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "माझे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी अत्यंत चांगले व कौटुंबिक संबंध आहेत. ते लष्करी इतिहासाचे गाढे अभ्यासक, तज्ज्ञ आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत." या संवादात त्यांनी हलक्या-फुलक्या अंदाजात "हॅलो, अंकल अमरिंदर!" असेही म्हटले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी राहुल गांधी यांनी जाहीरपणे त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या या आपुलकीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा आणि तर्कांना उधाण आले आहे.

पाहा व्हिडीओ

Rahul Gandhi favourite BJP leader name
सुप्रीम कोर्टात सुनावणी रंगली अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीचे 'हे' कारण आले समोर

झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही राहुल गांधी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देशाची शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. सर्वपक्षीय सरकारांना विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे गरज आहे. देशात जी विद्यार्थी आंदोलने होत आहेत ती शिक्षण व्यवस्थेविरोधात आहेत. केंद्र सरकार असो, काँग्रेस सरकार असो किंवा झारखंड सरकार असो, प्रत्येक सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी कारवाई केली पाहिजे.

Rahul Gandhi favourite BJP leader name
Mumbai Pune Expressway Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात, पुण्यातील युवा नेत्याचा जागीच मृत्यू

शिक्षणव्यवस्थेवर बोलताना गांधींनी आरोप केला की, ही व्यवस्था विचारवंतांना नष्ट करण्यात व्यस्त आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ताब्यात आल्यानंतर तिचे लक्ष तरुणांमधील स्वतंत्र विचारांना परावृत्त करण्याकडे वळले आहे.

तुम्ही बॅटमॅन आहात का असा प्रश्न राहुल गांधी यांना यावेळी विचारण्यात आला. यावर ते गंमतीने म्हणाले, "एवढंच म्हणूया की, मला आणि बॅटमॅनला आजपर्यंत कोणीही एकाच खोलीत एकत्र पाहिलेलं नाही."

आपल्याला सर्वाधिक प्रेरणा कुणाकडून मिळते? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनीभगवान बुद्ध, गुरु नानक देव, बसवण्णा, शंकरदेव, बिरसा मुंडा, पेरियार, महात्मा फुले, नारायण गुरु, बी. आर. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यासह इतरांच्या विचारांचा उल्लेख केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com