सुप्रीम कोर्टात सुनावणी रंगली अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीचे 'हे' कारण आले समोर

Eknath Shinde, Narendra Modi : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र न्यायालयातील सुनावणीच्या काळात होत असलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.
Eknath Shinde, Narendra Modi
Eknath Shinde, Narendra Modi
Published On

Eknath Shinde meets Narendra Modi in Delhi : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला जात असतानाच, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली असून, या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या 'दरे' (जि. सातारा) गावच्या दौऱ्यावर होते. मात्र, दौरा सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी त्यांनी तो तडकाफडकी आटोपता घेतला आणि ते थेट दिल्लीला रवाना झाले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेबाबतची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच शिंदे यांचा हा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. कोर्टातील युक्तिवाद आणि निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला गेले आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde, Narendra Modi
शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा पराक्रम! शेतात चालवायचा जुगार अड्डा; पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेन झी (Gen Z) च्या आंदोलनानंतर देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी एनडीएच्या (NDA) घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा प्रधानमंत्र्यांकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय या भेटीमध्ये सुप्रीम कोर्टातील सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तारातील खाती आणि विकासकामावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde, Narendra Modi
Mumbai Pune Expressway Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात, पुण्यातील युवा नेत्याचा जागीच मृत्यू

उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या खासदारांसह शिवसेनेच्या काही खासदारांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही मोदी यांची भेट घेतली. शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजतेय. तसेच, संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली असावी, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com