Shruti Vilas Kadam
वाइनसारखा डीप रंग साडीला एलिगंट लूक देतो. त्यासोबत मॅचिंग किंवा डार्क शेडचा ब्लाउज आणि बारीक बॉर्डर निवडल्यास लूक अधिक स्लीक दिसू शकतो.
गडद हिरवा रंग पारंपरिक तसेच स्टायलिश दिसतो. या रंगाच्या साडीसोबत मॅचिंग ब्लाउज आणि मिनिमल बॉर्डर निवडल्यास संपूर्ण लूक अधिक बॅलन्स्ड दिसतो.
नेव्ही किंवा रॉयल ब्लू यांसारखे डीप ब्लू शेड्स साडीमध्ये खूप आकर्षक दिसतात. टोन-ऑन-टोन ब्लाउजसोबत हा रंग स्टाइल केल्यास लूक अधिक एलिगंट दिसतो.
मावे पिंक हा सॉफ्ट आणि ट्रेंडी शेड आहे. या रंगाची साडी बारीक बॉर्डरसह आणि मोनोक्रोम ब्लाउजसोबत नेसल्यास लूक स्लीक आणि सोफिस्टिकेटेड दिसू शकतो.
ऑरेंज रंगाची साडी अधिक उठावदार दिसते. स्लिम लुकसाठी डीप किंवा रस्ट ऑरेंज शेड निवडता येईल. त्यासोबत त्याच टोनचा ब्लाउज आणि छोटे प्रिंट्स चांगले दिसतात.
चॉकलेट ब्राउनचा डीप शेड नाइट पार्टीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सॉलिड साडी आणि सिंपल ब्लाउजसोबत हा रंग स्टाइल केल्यास लूक क्लीन आणि एलिगंट दिसतो.
चारकोल ग्रे हा सटल आणि डीप शेड आहे. मॅचिंग ब्लाउज आणि मिनिमल ज्वेलरीसोबत हा रंग स्टाइल केल्यास लूक अधिक लांबट आणि बॅलन्स्ड दिसू शकतो.