Delhi AIIMS Saam Digital
देश विदेश

Delhi AIIMS Hospital: पहिल्याच पावसात AIIMS मध्ये साचलं पाणी; 9 ऑपरेशन थिएटर बंद, रुग्णाचे हाल

Water Logged in Delhi's AIIM Hospital: दिल्लीत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या पासाने संपूर्ण दिल्ली शहर प्रभावित झालं असून एम्समध्येही पाणी साचलं आहे. त्यामुळे तब्बल ९ ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्यात आली आहेत.

Sandeep Gawade

दिल्लीत दिल्लीत शुक्रवारी झालेल्या मुसळधार आणि पहिल्याच पावसामुळे एम्सच्या ऑपरेशन थिएटरवरही परिणाम झाला आहे. AIIMS ट्रॉमा सेंटरच्या तळमजल्यात पाणी साचल्यामुळे इमारतीचा वीडपुरवठा बंद करण्यात आला असून पाण्याचा निचरा झाल्याशिवाय वीजपुरवठा शक्य नाही. त्यामुळे तब्बल ९ ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शस्त्रक्रीया होणार असणाऱ्या रुग्णांचे अतोनात हाल झाल्याची माहिती आहे.

पावसामुळे दिल्ली एम्सची एक-दोन नव्हे तर नऊ ऑपरेशन थिएटर्स बंद आहेत. ऑपरेशन थिएटर्स बंद असल्याने डझनभर शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. विशेषत: ज्या रुग्णांवर आज शस्त्रक्रिया होणार होती, त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. हॉस्पिटलच्या स्टोअर रूममध्येही पावसाच्या पाण्याने पाणी भरल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्या रुग्णांना आपत्कालीन शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना सफदरजंग आणि राजधानीतील इतर सरकारी रुग्णालयात पाठवावे. उद्याही ऑपरेशन थिएटरवर परिणाम होण्याची भीती आहे. देशातील अव्वल रुग्णालयांमध्ये गणल्या जाणाऱ्या दिल्ली एम्सची ही अवस्था असेल तर विविध राज्यांतून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, गेल्या 20 ते 30 तासांत सफदरजंग येथे 228.1 मिमी, लोधी रोड 192.8 मिमी, रिजमध्ये 150.4 मिमी, पालममध्ये 106.6 मिमी पाऊस झाला आहे. तर आयानगर येथे ६६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात 124.5 ते 244.4 मिमी पाऊस हा अतिवृष्टी मानला जातो. प्रगती मैदानासह प्रमुख बोगदे बंद करावे लागले आहेत. हौज खास, दक्षिण विस्तार आणि मयूर विहार या उच्चभ्रू भागांसह शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पावसानंतर दिल्लीतील जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT