Delhi Airport VIDEO : दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना, अचानक छताचा भाग कोसळला; अनेक वाहनांचा चक्काचूर

Roof collapses at Delhi Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल - १ मधील छताचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.
Roof collapses at Delhi Airport
Roof collapses at Delhi AirportSaam TV

राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल - १ मधील छताचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक वाहने छताखाली दबली असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Roof collapses at Delhi Airport
Sunita Williams: अंतराळात अडकल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स; माघारी पृथ्वीवर कसे येणार अंतराळवीर?

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, छत कोसळण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या अपघातात अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. राजधानी दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसासोबत वाऱ्याचा जोरही अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याचा फोन त्यांना शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. एअरपोर्टच्या छताखाली काही गाड्या अडकून पडल्या आहेत.

या गाड्यांमध्ये प्रवासी असल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून ४ जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, छत कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओत छत कोसळल्यामुळे वाहनांचा चक्काचूर झाल्याचं दिसून येतंय.

Roof collapses at Delhi Airport
NEET Paper Leak Case: NTA चा आणखी एक कारनामा उघड; प्राध्यापकाऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्याला बनवलं निरीक्षक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com