NEET Paper Leak Case: NTA चा आणखी एक कारनामा उघड; प्राध्यापकाऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्याला बनवलं निरीक्षक

Neet Exam Paper Leak News: शनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कारभाराबाबत दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. आता प्राध्यापकांऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्यांपासून ते निवृत्त लष्करी जवानांना निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
NEET Paper Leak Case: NTA चा आणखी एक कारनामा उघड; प्राध्यापकाऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्याला बनवलं निरीक्षक
Neet Paper Leak CaseSaam Digital

नीट (NEET) आणि नेट (NET) परीक्षेचा पेपरपुटीच्या गोंधळ अद्याप संपलेला नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालं आहे. एनटीएने घेतलेल्या सर्व परीक्षांमध्ये अनियमितता समोर आली असतानाच आता परीक्षेत निरीक्षकाच्या नेमणुकीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रेडिट कार्ड विक्रेत्यांपासून ते निवृत्त लष्करी जवान आणि शाळेतील शिक्षकांना निरीक्षक म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

NEET Paper Leak Case: NTA चा आणखी एक कारनामा उघड; प्राध्यापकाऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्याला बनवलं निरीक्षक
Nitish Kumar : देशात मोठी राजकीय घडामोड होणार, इंडिया आघाडीत नितीश कुमार यांची वापसी होणार? RJDच्या बड्या नेत्याचा दावा

NTA चा कारनामा इथेच थांबत नाही. कोणतेही काम न करणाऱ्या काही लोकांना निरीक्षकाची जबाबदारीही देण्यात आली होती. याबाबत अनेक निरीक्षकांनी शिक्षण मंत्रालयाकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणत्याही परीक्षेत ज्या प्रकारची गुप्तता आणि दक्षता बाळगली पाहिजे, ती पाळली जात नाही. खासगी महाविद्यालयातील शिक्षकाला बोर्डाच्या परीक्षा, बीएड प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षांमध्येही निरीक्षक बनवण्याचे कोणतेही नियम नाहीत, कारण सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नसते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

निरीक्षक हा कोणत्याही केंद्राचा सर्वेसर्वा असतो. तो स्ट्राँग रूममधून प्रश्नपत्रिका घेऊन येतो. कोणता कक्ष निरीक्षक कोणत्या रूमवर ड्युटी करणार हेही निरीक्षक ठरवतात. निरीक्षक असो की इनविजिलेटर, त्याची नेमणूक करण्यापूर्वी देण्यापूर्वी, त्याचा मुलगा, मुलगी किंवा नातेवाईक यापैकी कोणीही त्या केंद्रावर परीक्षा देत आहे की नाही याची संपूर्ण पडताळणी केली जाते, असं दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे. टीव्ही ९ ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

NEET Paper Leak Case: NTA चा आणखी एक कारनामा उघड; प्राध्यापकाऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्याला बनवलं निरीक्षक
Lal Krishna Advani Health Update: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, युरोलॉजी विभागात उपचार सुरू

पेपरफुटी आणि गैरप्रकारानंतर कोर्टाने जरी सगळी परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला असला तरी जवळपास 1563 विद्यार्थ्यांची नीट परीक्षा पुन्हा होणार आहे. याच परीक्षेचा गोंधळ सुरू असताना केंद्र सरकारनं UGC NET, CSIR-UGC-NET या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनटीए खासगी बँकांमध्ये क्रेडिट कार्ड विकणाऱ्या लोकांनाही निरीक्षक बनवत असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण मंत्रालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कोटक महिंद्रा बँकेत क्रेडिट सेलर म्हणून काम करणाऱ्या नेहा मित्तल यांची अनेक परीक्षांमध्ये निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याचंय म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com