delhi 25 years old ca death saam tv
देश विदेश

Death : २५ वर्षीय CA ने आयुष्य संपवलं, फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्... तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हडबडले

Shocking News : एकाकीपणाला कंटाळलेल्या एका २५ वर्षीय सीए तरुणाने गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केली. हेलियम गॅसचा वापर करुन त्याने स्वत:चे आयुष्य संपवले. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांनी सुसाईट नोट सापडली आहे.

Yash Shirke

  • २५ वर्षीय सीए तरुणाने आत्महत्या केली.

  • हेलियम गॅसचा वापर करुन तरुणाने स्वत:ला संपवले.

  • तरुणाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळली.

Shocking : एका २५ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने एकाकीपणाला कंटाळून आत्महत्या केली. हेलियम गॅसने स्वत:ला गुदमरवून घेत सीएसने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीमध्ये घडला आहे. नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या सीएसचा मृतदेह गेस्ट हाऊसच्या बेडवर पडलेला आढळला. नवी दिल्लीतील बाराखंबा पोलिसांनी तरुणाचा मृतदेह, हेलियमचा सिलेंडर आणि पाइप लेडी हार्डिंग रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव धीरज कंसल असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाचा धीरज तोंडात हेलियम गॅस सिलेंडरला जोडलेला पाईप घेऊन झोपला होता. शरीरात हेलियम गॅस गेल्याने गुदमरुन धीरजचा मृत्यू झाला. तो महिपालपूरमधील एका पीजीमध्ये राहत होता. दिल्लीतील एअरबीएनबी गेस्ट हाऊसमध्ये धीरजने आत्महत्या केली. गेस्टहाऊसमधील त्याचा खोलीचा दरवाजा बंद असल्याने आणि खोलीतून दुर्गंधी आल्याने पोलिसांना संपर्क करण्यात आला. तेव्हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. धीरजच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट आढळली.

'माझ्या मृत्यूने कुणी दुःखी होऊ नका. माझ्यासाठी मृत्यू हा आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहे. आत्महत्या करणे वाईट नाही. माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती आणि मी कोणाशीही फारसा संलग्न नव्हतो, माझा कोणाशीही संबंध नव्हता. माझ्यामुळे कोणीही नैराश्यात जाणार नाही', असे धीरजने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. धीरजने मास्क घातला होता, जो पातळ निळ्या पाईपद्वारे व्हॉल्व्ह आणि मीटरने हेलियम सिलेंडरला जोडलेला होता. त्याच्या चेहऱ्याभोवती पातळ पारदर्शक प्लास्टिक गुंडाळले होते आणि मानेवर एक सील होता.

धीरजच्या वडिलांचे २००३ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केले होते. त्याला भाई-बहीण नाहीयेत, तो एकुलता एक आहे. तो पीजीमध्ये राहत होता, व्यवसायाने तो सीए आहे. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर त्याचे काका आणि चुलत भाऊ समोर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलियम गॅसने होणारा मृत्यू हा अतिशय वेदनादायक असतो. हेलियम हा एक निष्क्रिय वायू आहे. तो फुफ्फुसातील ऑक्सिजन कमी करतो, त्यामुळे कोणताही संघर्ष किंवा धक्का न लागता गुदमरल्यासारखे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT