Dehradun News
Dehradun News Saam Tv
देश विदेश

Dehradun News: प्रेयसीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुण चोरून घरी घुसला अन् खोलीत जाऊन…

Shivani Tichkule

Dehradun : प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं म्हणतात. असेच एक प्रकरण उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून समोर आले आहे. प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबाबत लग्न केल्याने प्रियकर थेट प्रेयसीच्या घरी पोहोचला. (Latest Marathi News)

यावेळी प्रेयसीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने तिच्याच घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तरुणाचे विवाहितेवर एकतर्फी प्रेम होते, असे सांगितले जात आहे. 

डेहराडूनच्या (Dehradun) प्रेमनगर भागातील ही घटना आहे. शाहनवाज असे या मृत तरुणाचे नाव असून तो रोजंदारी मजूर होता. शाहनवाजचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर प्रेम होते. दोघांचे नाते सुमारे दीड वर्षे टिकले. दोन महिन्यांपूर्वी दोघांचे काही कारणावरून बोलणे बंद झाले. शाहनवाजने अनेक प्रयत्न करूनही प्रेयसी त्याच्याशी न बोलल्याने त्याला त्रास होत होता. (Crime News)

सोमवारी (१७ एप्रिल) सकाळी ही महिला घरात एकटीच होती. संधी साधून शाहनवाज तिच्या घरात घुसला, तिथे दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. शाहनवाजने तिच्यावर आपल्या सोबत नात्यात राहण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, परंतु महिलेने ते मान्य केले नाही.

त्यानंतर शाहनवाजने महिलेला धमकी दिली की तो तिच्यासमोर आत्महत्या करेन परंतु त्या महिलेने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. काही वेळाने शाहनवाज हा महिलेच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. तेथे त्याने केबलची वायर घेत पंख्याला बांधून आत्महत्या केली.

या घटनेत प्रेयसीने त्याला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु महिलेला काहीच यश आले नाही. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज हा रोजंदारी करत होता. याबाबत पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

SCROLL FOR NEXT