Chhota Rajan News: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोठा झटका; सिंगापूरमधील साथीदार अबू सावंत सीबीआयच्या जाळ्यात
Chhota Rajan News Update : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार संतोष महादेव सावंत उर्फ अबू सावंत याला भारतात आणण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. अबू सावंत दोन दशकांपासून फरार होता, त्यामुळे अखेर मंगळवारी त्याला सिंगापूरमधून भारतात हद्दपार करण्यात आले. सीबीआयने त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)
अबू सावंतला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अबू सावंतचे भारतात प्रत्यार्पण हा छोटा राजनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण अबू सावंत हा छोटा राजनच्या काळ्या पैशाचा हिशेब ठेवायचा. तो छोटा राजनचा (Chhota Rajan) अत्यंत निकटवर्तीयांपैकी मानला जातो.
अबू सावंतच्या प्रत्यार्पणासाठी 2000 मध्ये कागदोपत्री कारवाईला सुरुवात झाली होती. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (Notice) जारी केली होती. दशकभराच्या कालावधीनंतर त्याचे प्रत्यार्पण झाले आहे. सावंतवर मुंबई (Mumbai) गुन्हे शाखेसह सीबीआयकडेही (CBI) अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे सीबीआय पहिल्यांदा त्याची कोठडी घेईल. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेला त्याचा ताबा मिळेल.
अबू सावंतवर सहा गुन्हे प्रलंबित
अबू सावंतवर सहा गुन्हे प्रलंबित असून त्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अबू आणि छोटा राजनची पत्नी यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. दोघेही या प्रकरणात आरोपी आहेत. हे प्रकरण 2006 चे आहे. त्यानंतर गुन्हे शाखेने छोटा राजनची पत्नी आणि दोन जणांना टिळक नगर येथील एका बिल्डरला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.