Sanjay Rathod News: मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार? थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र धाडून केली तक्रार

Sanjay Rathod Office Corruption: मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे
Eknath Shinde and sanjay rathod
Eknath Shinde and sanjay rathodSaam tv
Published On

Mumbai News: मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन उभे करून बंद पुकारणाऱ्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री व यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झाल्याचा या पत्रात नमूद केला आहे.

Eknath Shinde and sanjay rathod
Saamana Editorials On BJP: बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले.. सामनातून भाजपवर शरसंधान

राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. मात्र औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरिता प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरिता निलंबित करणे कारवाई केली जाते.

तसेच परवाने कायमस्वरूपी रद्द करणे अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचं संघटनेने या पत्रात म्हटले आहे. शिवाय अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विकेत्याना आवाजवी शिक्षा केली जात आहे. (Maharashtra Latest News)

प्रत्यक्षात औषध विक्रेत्यांना मंत्र्यांचे पीएस, ओएसडी यांच्यावर प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार सुद्धा या पत्रात करण्यात आली आहे. या संदर्भात यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना भेटून या तक्रारी केल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढलेला पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde and sanjay rathod
Mumbai Mantralaya News: मंत्रालयात उंदरांचा धुडगूस; विभागातील कागद व फायली कुरतडल्या

त्यामुळे राज्य सरकारने या तक्रारीची गांभीर्याने न घेतल्यास राज्य संघटना या विरोधात आंदोलन उभे करणार आहे. तसेच प्रसंगी बंद ही पुकारला जाईल व त्याच्या परिणामाला सरकार व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com