Mumbai Mantralaya News: मंत्रालयात उंदरांचा धुडगूस; विभागातील कागद व फायली कुरतडल्या

Rats Numbers Increased in Mantralaya: मंत्रालयात उंदरांनी धुडगूस घातला आहे, मंत्रालयातील प्रत्येक विभागात उंदरांनी कागद, फायली कुरतडल्याचे चित्र दिसून येत आहे.
Mantralaya mumbai News
Mantralaya mumbai NewsSAAM TV

Mumbai News: मंत्रालयात उंदरांनी धुडगूस घातला आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात उंदरांनी कागद, फायली कुरतडल्याचे चित्र दिसून येत आहे. मंत्रालयातील वाढत्या उंदरांमुळे बहुतांश फायली कुरतडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वीच मंत्रालयाच्या दुसऱ्या एकाच दिवसात ४ मोठे उंदीर मारणण्यात आले होते. आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याचा कंत्राटातील भ्रष्टाचार प्रकरण समोर आणल्यानंतर आता उंदीर मारण्याचे कंत्राट देण्याचे बंद करण्यात आले आहे.

Mantralaya mumbai News
Maharashtra Politics: बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले.. सामनातून भाजपवर शरसंधान

मंत्रालयात उंदीर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी ४ उंदीर मारले होते. मंत्रालयात अक्षरश: उंदरांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. उंदरांनी फायली, झेरॉक्स पेपर आणि कार्यालयीन पेपर कुरतडून टाकल्याचे चित्र आहे. मंत्रालयाच्या इमारतीची देखभाल ही सार्वजनिक विभागामार्फत होते. मात्र, उंदरांनी उच्छाद हा याच विभागात मांडला आहे.

उंदरांनी मंत्रालयात तीन-चार बिळ तयार केले आहेत. यामुळे मंत्रालयात उंदरांचा संचार वाढला आहे. अगदी तळमजल्यावरील पत्रकार कक्षापासून सहाव्या मजल्यावर उंदरांचा उच्छाद सुरू आहे .याआधी देखील एसीच्या यंत्रणेपासून आयटी विभागाच्या वायर देखील उंदरांनी कुरतडल्या आहेत.

Mantralaya mumbai News
Accident News: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 4 वाहनं एकमेकांना धडकली, पिता-पुत्राला मृत्यूने गाठलं

दरम्यान, उंदरांचा उच्छाद वाढल्याने मांजरांचा वावर देखील परिसरात वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक मजल्यावर मांजरांसाठी खाद्य ठेवले जाते. मांजरांचा संख्या वाढली असली तरी उंदरांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मांजरांना खाद्य देऊ नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

आरोपानंतर कंत्राटच बंद

आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात उंदीर मारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. खडसे यांनी कंत्राट आणि मारलेल्या उंदरांचा हिशोबच मांडला होता. या प्रकरणानंतर मंत्रालयात उंदीर मारण्याचे कंत्राट देण्याचे बंद केले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com