Chh. Sambhaji Nagar Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 4 वाहनं एकमेकांना धडकली, पिता-पुत्राला मृत्यूने गाठलं

Chhatrapati Sambhaji Nagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला.
Chhatrapati Sambhaji Nagar Accident News
Chhatrapati Sambhaji Nagar Accident Newssaam tv

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News: छत्रपती संभाजीनगरमध्ये चार वाहनं एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील नक्षलवाडी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला.

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News
Nandurbar News: ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, 20 पेक्षा जास्त वाहनं जळून खाक

या अपघातात सासरवाडीला जात असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सासरवाडीला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील दोन सदस्य या अपघातात ठार झाले. या अपघातात पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी कौशल्या दहिफळे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar)

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News
Mumbai Crime News: धक्कादायक! यूट्यूबर तरुणीचे फोटो मॉर्फ करायचे, नंतर पैसे घेऊन सोशल मीडियावर....

चार वाहनांमध्ये झालेल्या या विचित्र अपघातात मोटार सायकल दोन वाहनांच्यामध्ये आली होती. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी कौशल्या दहिफळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहिफळे हे दांपत्य सासरवाडीला जात असताना हा काळाने त्यांच्यावर घाला घातला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com