Surat Accident  Saam Tv
देश विदेश

Accident: तो प्रवास ठरला अखरेचा! मांजा अडकल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली, बापलेकीचा जागीच मृत्यू

Surat Accident: गुजरातच्या सूरतमध्ये पंतगीच्या मांजाने बापलेकीचा जीव घेतला. मांजा अडकल्यामुळे दुचाकीसह आई-वडील आणि मुलगी पुलावरून खाली कोसळले. या अपघातामध्ये बापलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली.

Nandkumar Joshi

Summary:

  • गुजरातच्या सूरतमध्ये भयंकर अपघात

  • मांजाने घेतला बापलेकीचा जीव

  • मांजा अडकल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली

  • अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली

गुजरातच्या सूरतमध्ये मांज्यामुळे भयंकर रस्ते अपघात झाला. मांजाने एकाच कुटुंबातील दोघांचा जीव घेतला. दुचाकीवरून आई-वडील आणि चिमुकली फिरायला निघाले होते पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. पंतगीच्या मांजामुळे त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि पुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर चिमुकलीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेहान रहीम शेख (३५ वर्षे) हे बायको रेहाना आणि १० वर्षांची मुलगी आयेशासोबत दुचाकीवरून जात होते. तिघेही सुट्टी असल्यामुळे फिरायला निघाले होते. त्यावेळी अचानक पतंगीचा मांजा समोर आला आणि रेहान यांच्या अंगात मांजा अडकला. हा मांजा बाजूला करण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित झाली आणि पुलाच्या संरक्षण भिंतीला धडकली. त्यानंतर ही दुचाकी थेट ७० फूट उंच पुलावरून खाली कोसळली.ACcident

या अपघातामध्ये वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचकीस्वाराची बायको बचावली. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. दुचाकी जेव्हा पुलावरूनखाली कोसळली. तेव्हा दुचाकीस्वाराची बायको पुलाखील उभ्या असलेल्या रिक्षावर पडली त्यामुळे ती बचावली. या अपघातामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये दुचाकी आणि रिक्षाचा चुराडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

Hair Care Tips: कोंडा आणि केसांचा कोरडेपणा होईल कमी, फक्त केसांना लावा १ चमचा तूप

Maharashtra Live News Update: माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

Pune Tourism : डोंगर, धबधबा, किल्ला; सर्वकाही एकाच ठिकाणी, पुण्यातील 'हे' ठिकाण पर्यटकांचे आकर्षण

Mayor Post : महापौरपदावरून भाजप-शिंदेसेना युती तुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT