Bihar Fire News saam tv
देश विदेश

Bihar Fire News : दुर्दैवी! लग्नघरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळं सिलिंडरचा स्फोट; कुटुंबातील ६ जण होरपळले

Darbhanga News: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या दरभंगा भागातील एका लग्नघरात फटाक्यांच्या आतिशबाजीने सिलिंडरचा स्फोटमुळे आग लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या दरभंगा भागातील एका लग्नघरात फटाक्यांच्या आतिशबाजीने सिलिंडरचा स्फोटमुळे आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत एका कुटुंबातील तब्बल सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि अग्नीशनमदल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना बिहारच्या दरंभगा जिल्ह्यातील अलीनगर प्रखंडच्या अंटोर गावामधील आहे. या गावात लग्नकार्य सुरु होते. या लग्नकार्यादरम्यान काही लोकांनी फटाके लावत होते. त्या दरम्यानच फटाके लावल्यानंतर फटाक्यांची आग जवळील असलेल्या घराला लागते. क्षणार्धात आग संपूर्ण घराला लागते.

घराबाहेर लागलेली आग घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचते आणि काही वेळाने या आगीमुळे सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली,ज्यामुळे त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळांचा भडका उडू लागला.

लागलेल्या आगीमुळे सर्वत्र आरडाओरडा सुरु झाली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण इकडे तिकडे धावू लागले. संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. आग दूरवर पसरली. तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. या दुर्देवी घटनेत एका कुंटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत डीएम राजीव रोशन यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT