Ratan Tata, Cyrus Mistry  Saam Tv
देश विदेश

Cyrus Mistry Accident| रतन टाटा आणि सायरस मिस्त्री हे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा होते

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे.

Santosh Kanmuse

मुंबई: टाटा सन्सचे (Tata Group) माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा आणि टाटा समुहाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू होता. त्यामुळे हे प्रकरण देशभर गाजले होते. सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांचे कौटुंबिक संबंध होते.

मागील मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने उद्योग जगतात मोठा निर्णय दिला. या निर्णयामुळे रतन टाटा यांचा टाटा समूह आणि मिस्त्री कुटुंबातील सायरस मिस्त्री यांच्यातील दीर्घकाळाचा वादही संपुष्टात आला होता. मात्र, रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातही कौटुंबिक संबंध असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांचे एकमेकांशी कसे संबंध होते ते आपण जाणून घेऊया.

पालोनजी मिस्त्री कुटूंब

प्रसिध्दीपासून दूर राहिलेले सायरस मिस्त्री हे सामान्य उद्योपती नव्हते. ते प्रसिद्ध भारतीय वंशातील खरबपती पल्लोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. पालोनजी शापूरजी यांना दोन पुत्र होते एक शापूर आणि दुसरे सायरस मिस्त्री होते. तर दोन मुलीही आहेत. एक लैला आणि अल्लू. पालोनजी शापूरजी यांच्या एका मुलीचा म्हणजे अल्लू हिचे लग्न नोएल टाटा यांच्याशी झाले आहे, नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत.

याच नात्याने रतन टाटा (Tata Group) आणि सायरस मिस्त्री हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पालोनजी मिस्त्री यांनी एका आयरिश महिलेशी लग्न केले आणि नंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले. त्यांचा बराचसा वेळ मुंबईत गेला. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कपड्यांपासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.

कोर्टात सुरू होता वाद

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांचा वाद बराच दिवस कोर्टात सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाने रतन टाटा यांना दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा समुहाचे चेअरमन झाले होते. २०१६ पर्यंत मिस्त्री यांनी कार्यभार सांभाळला होता. पण त्यांना २०१६ मध्ये पद सोडावे लागले होते.

मिस्त्री यांनी टाटा सन्स (Tata Group) आणि रतन टाटा यांच्या विरोधात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये धाव घेतली होती, त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून अचानक हटवण्यात आले होते. एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावली होती.

त्यानंतर हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) पर्यंत पोहोचले आणि सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निकाल आला. त्याचवेळी या निर्णयाविरोधात टाटा समूहाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वाच्चा न्यायावयाने टाटा समुहाला दिलासा दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT