Video |पंतप्रधान मोदी फक्त दोन उद्योगपतींसाठी काम करतात; राहुल गांधींची भाजप सरकारवर जोरदार टीका

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि मोदी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला.
rahul gandhi and narendra modi
rahul gandhi and narendra modi saam tv

Rahul Gandhi News : जीएसटी, वाढती महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरुद्ध काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राहुल गांधीच्या नेतृत्वात आज रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात काँग्रेसकडून 'हल्लाबोल रॅली'चे आयोजन करण्यात आलं. या रॅलीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि मोदी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला.

rahul gandhi and narendra modi
Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझादांनी केली नव्या पक्षाची घोषणा

राहुल गांधी यांनी 'हल्लाबोल रॅली'मध्ये मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, 'देशात भाजप सरकार आल्यानंतर सामाजिक वातावरण बिघडलं आहे. भाजप सरकार सत्तेवर विराजमान झाल्यावर समाजात द्वेष वाढला आहे. सरकार देशातील दोन मोठ्या उद्योगपतींचा फायदा कसा होईल, या उद्देशाने सरकार काम करत आहे'. राहुल गांधी यांनी वाढत्या डिझेल-पेट्रोल वाढीवरूनही मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

rahul gandhi and narendra modi
Congress Rally: "आम्हाला राहुल गांधी हेच अध्यक्ष हवेत"; कॉंग्रेसच्या महारॅलीत झळकले पोस्टर्स

राहुल गांधी पुढे म्हणाले, 'काँग्रेस पक्ष देशाला जोडायचं काम करतो आणि भाजप पक्ष देश तोडण्याचं काम करतो. देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने देशाला वाचवलं. यूपीए सरकारने देशात मनरेगा योजना आणली नसती, तर देशात हाहाकार माजला असता. आमच्या सरकारने देश व्यवस्थित चालवला. त्यामुळे आज आम्ही भारतीय संविधान आणि देशाला वाचविण्यासाठी लढत आहोत. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते देशाला वाचवू शकतात. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाचा विकास करू शकते. सत्तेत विराजमान झालेले पंतप्रधान मोदी देशाला कमकुवत करत आहेत'.

'काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेचा एक दिवस पराभव नक्कीच करेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com