Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझादांनी केली नव्या पक्षाची घोषणा

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद पहिल्यांदाच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत.
Ghulam Nabi Azad's New Party
Ghulam Nabi Azad's New PartyAni/Saam TV
Published On

जम्मू-काश्मीर: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज त्यांच्या जम्मू येथील रॅलीमध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसंच या नव्या पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोकंच ठरवतील अस देखील त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज पहिल्यांदाच गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावेळी त्यांची सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.

सैनिक कॉलनीतील सबेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले, 'मी पार्टी काढणार असल्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. मात्र, मी कोणाचही वाईट चिंतत नाही. आम्ही घाम गाळून काँग्रेस (Congress) बनवली आहे, उभी केली आहे.

काँग्रेस ही केवळ कॉम्पुटर आणि ट्विटरमधून बनलेली नाही. ज्या लोकांचे आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांची मजल केवळ कॉ्म्पुटर आणि ट्विटरपर्यंत आहे आणि यामुळेच काँग्रेस आता जमीनीवर, ग्राऊड लेवलला दिसत नाहीये. ते लोक डिबेटमध्ये खूश आहेत त्यांना ते लखलाभ असो, आम्हाला वृद्ध लोकं आणि शेतकऱ्यांसोबत रहायचं आहे त्यांना त्यांची बादशाही मुबारक असं आजाद म्हणाले.

पार्टीचं नावं काश्मिरचे लोकं ठरवणार -

अद्याप नवीन पार्टीचं नाव ठरवलेलं नाही मात्र, काश्मीरची जनताच पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवतील मात्र, माझ्या पक्षाला हिंदुस्तानी नाव देणार जे सर्व लोकांना समजेल असं ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आज माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत केले. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रॅली देखील काढण्यात आली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com