Cyclonic Storm Montha Latest Update : अतिवृष्टीनंतर अवकाळीने बेजार झालेल्या महाराष्ट्रावर आता आणखी एक संकट ओढावले आहे. बंगालच्या उपसागरात खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार होत आहे. ११० च्या वेगाने वारे वाहत असल्याने हे चक्रीवादळ लवकरच समुद्राच्या किनाऱ्याला धडकू शकतं. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किनारी भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Cyclone Montha latest update by IMD)
अरबी समुद्रात ११० च्या वेगाने वारे वाहत आहे. त्याचा परिणाम चक्रीवादळावर होऊ शकतो. २७ ऑक्टोबर रोजी दक्षिण पश्चिम दिशेच्या आपसपास बंगालच्या उपसागरात वाऱ्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते किती तीव्र होईल, त्याकडे हवामान विभागाचे लक्ष असेलच, पण सध्या सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजेपर्यंत समुद्रात चक्रीवादळाला पूरक स्थिती होती. अंदमान आणि निकोबारपासून ६७० किमी पश्चिमेस, चेन्नईपासून ७२० किमी पूर्व-आग्नेयेस, विशाखापट्टणमपासून ७९० किमी आग्नेयेस आणि गोपालपूरपासून ९०० किमी आग्नेयेस चक्रीवादळ तयार होण्यास सुरूवात झाली. पुढील १२ तासांत ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची आणि नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ मोंथामध्ये तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते वायव्येकडे सरकेल आणि २८ तारखेच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल आणि २८ तारखेच्या संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील समुद्र किनारा ओलांडेल. ही प्रक्रिया सुरू असतानाच महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
संभाव्य वादळाच्या प्रभावामुळे आज सकाळपासून ओडिशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कोरापूट, मलकानगिरी, नवरंगपूर, कालाहांडी, कंधमाल, गंजम, गजपती आणि रायगडा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुरी, गंजम आणि गजपती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एस. करुणासागर यांनी २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान आंध्रच्या काही भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा ७० किमी प्रतितास वेगाने असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने २९ ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.