Cyclone Michaung wreaks havoc in Tamil Nadu and Andhra Pradesh, many houses under water in Chennai Saam TV
देश विदेश

Cyclone Michaung: मिचाँग चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मोठं नुकसान; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, शेकडो घरे पाण्याखाली

Satish Daud

Cyclone Michaung Latest Updates

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं. या चक्रीवादळाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना तडाखा दिला. चेन्नईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत.

झाडे उन्मळून पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडीत आहे. आतापर्यंत या चक्रीवादळाने १७ जणांचा बळी घेतला असून कित्येक लोक जखमी झाले आहे. चक्रीवादळाच्या तडाखा बसलेल्या भागात बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चेन्नई आणि त्याच्या उपनगरातील काही भागातील लोकांना अजूनही अस्वच्छ पाणी आणि विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. चक्रीवादळामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने लाखो हेक्टर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने भीषण पुरामुळे चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्या गुरुवारपर्यंत वाढवल्या आहेत.

पल्लवरम, तांबरम, वंडलूर, थिरुपुरूर, चेंगलपट्टू आणि थिरुकाझुकुंद्रम येथील शैक्षणिक संस्था शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहेत. पूरस्थितीमुळे चेन्नईतील रहिवाशांना दूध, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.

प्रत्यक्षात पुरामुळे या सर्व गोष्टींचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाल्याचं सरकारच्या वतीने सांगितलं आहे. यातील सर्वाधिक मृत्यू चेन्नईमधील आहेत. पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT