Maha Shivratri: महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी; देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी Saam Tv
देश विदेश

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी; देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

महाशिवरात्री निमित्त देशामध्ये विविध भागातील मंदिरामध्ये रोषणाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त देशामध्ये विविध भागातील मंदिरामध्ये (temple) रोषणाई करण्यात आली आहे. भाविक मोठ्या उत्साहामध्ये मंदिरात दर्शनाकरिता गर्दी करत आहेत. मात्र, या दरम्यान झारखंड (Jharkhand) मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंड मधील बाबाधाम मंदिरामध्ये प्रचंड गर्दी (crowd) झाली आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Crowd devotees occasion Mahashivaratri Many were injured)

हे देखील पहा-

भाविकांनी (devotees) मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि यामुळे जिल्हा प्रशासन (District Administration) आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था काही क्षणासाठी कोलमडून गेली होती. प्रशासनाच्या गलथान कारभाराने दर्शनम काऊंटरजवळ मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक पुरुष आणि महिला जखमी झाले असल्याचे एका वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त समोर आणले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने भाविकांवर लाठीमार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा गोंधळ खूप वेळ सुरू होता. यावेळी पूजा आणि दर्शनाकरिता आलेले बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांना देखील जिल्हा प्रशासनाने सहकार्य केले नाही. या दरम्यान मंदिराच्या व्यवस्थापकाने आमदार (MLA) अंबा प्रसाद यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली होती. याचवेळी आमदार अंबा प्रसाद जखमींना भेटण्यासाठी पोहोचल्या आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी एसडीओंकडे पोहचल्या तेव्हा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: बारामतीत अजित पवार यांच्या अस्थीचे विसर्जन

ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

Korean Skin Care: ग्लोईंग आणि कोरियन ग्लास स्किन पाहिजे? मग रोज रात्री झोपताना 'ही' घरगुती पेस्ट नक्की लावा

Valentine Day 2026: प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात कधी होणार? जाणून घ्या प्रत्येक दिवस का आहे खास?

SCROLL FOR NEXT