Happy Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

महाशिवरात्रीचा दिवस भाविकाकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असतो.
Happy Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Happy Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दीSaam Tv
Published On

मुंबई: महाशिवरात्रीचा दिवस भाविकाकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री (Mahashivratri) साजरी केली जात असते. प्रत्येकवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये (Shiva temples) दर्शनाकरिता भक्तांची मोठी गर्दी असते. मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात (Babulnath Temple) देखील आज महाशिवरात्री साजरा करण्याकरिता भाविकांनी (devotees) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे. मध्यरात्री १२ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनाकरिता बाबुलनाथ मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (Large crowd devotees Babulnath temple Mumbai occasion Mahashivaratri)

महाशिवरात्रीचा एक पवित्र सण जो देशभरामध्ये अतिशय भक्तिभावाने सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. मात्र, देशाबरोबरच राज्यावर (state) देखील मागील २ वर्षासून कोरोनाचे (Corona) सावट आहे. यामुळे भाविकाकरिता मुंबईत (Mumbai) प्राचीन बाबूलनाथ मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. भाविकांकरिता दर्शनासाठी ऑनलाईन (Online) व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध देखील शिथील करण्यात आले आहेत. यामुळे तब्बल २ वर्षानंतर आज महाशिवरात्रि निमित्ताने बाबूलनाथ मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, दर्शनाकरिता मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून भाविकांनी बाबुलनाथ मंदिरात दर्शन करण्याकरिता मध्यरात्रीपासून मोठी गर्दी केली आहे. २ वर्षानंतर भाविकांना मंदिरात दर्शन भेटल्यावर त्यांच्यामध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. बाबुलनाथ मंदिर हे मुंबई मधील सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजा भीमदेव यांनी हे मंदिर १२ व्या शतकामधील बांधलेले मंदिर आहे. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते. मात्र, १७८० साली मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा आणि जागरण ही ३ अंगे पाळले जात असतात.

शिवरात्रीला रात्रीच्या ४ प्रहरी ४ पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेमध्ये देवाला अभ्यंगस्नान घालावे लागते. बेल, पांढरी फुले आणि रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा आणि आंबा यांची पत्री देखील या पूजेत वाहत असतात. तांदळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे लागते. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात.

Happy Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Russia Ukraine War: कीव्ह शहराला वेढा; सॅटेलाइटच्या फोटोमध्ये दिसली युक्रेनची भयानक स्थिती

ओम नम: शिवाय बरोबरच शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करत परत पूजा करावी लागते. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालत असतात. शिवाच्या पूजेत हळद- कुंकू वापरत नाही, भस्म वापरत असतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरले जातात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू आणि पांढरी फुले वाहत असतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालत असतात.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com