Cotton Candy Saam Tv
देश विदेश

Cotton Candy: कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी; पॉंडिचेरी सरकारने का घेतला असा निर्णय?

Rohini Gudaghe

Cotton Candy Banned Reason

कॉटन कँडीचे (Cotton Candy) नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानपणी आपण सर्वांनीच ती खूप आवडीने खाल्ली आहे. लहानांपासून वडिलधाऱ्यांचाही हा आवडीचा विषय आहे. पण आता पाँडिचेरी सरकारने कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. पॉंडिचेरी सरकारने हा निर्णय का घेतला, हे आपण जाणून घेऊ या. (latest marathi news)

कॉटन कँडी बनवण्यासाठी विषारी पदार्थांचा वापर केला जात आहे, असं काही अहवालांमधून समोर आलं आहे . त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. मात्र, कॉटन कँडीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. अन्न सुरक्षा विभागाकडून गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेले विक्रेते कॉटन कँडीची विक्री सुरू ठेवू शकतात, असं देखील सरकारने (Pondicherry) सांगितलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॉटन कँडीमध्ये विषारी रसायन

पॉंडिचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, केंद्रशासित प्रदेशात विकल्या जाणाऱ्या कॉटन कँडीमध्ये 'रोडामाइन-बी' नावाचं हानिकारक रसायन असल्याचं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आढळले आहे. यानंतर कॉटन कॅंडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले (Cotton Candy Banned In Pondicherry) आहेत.

आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. आदेशात म्हटलंय की, ज्यांच्याकडे गुणवत्ता प्रमाणपत्र नाही, त्यांनी त्वरित अन्न सुरक्षा विभागाशी संपर्क साधावा. गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, ते कॉटन कँडीची विक्री सुरू करू (Cotton Candy Banned) शकतात. त्यांना जितक्या लवकर हे प्रमाणपत्र मिळेल. तितक्या लवकर ते आपला व्यवसाय सुरू करू शकतात. तोपर्यंत कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

कडक कारवाईचे आदेश

सरकारच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात सरकारने एक व्हिडिओ क्लिप देखील प्रसारीत केली आहे. व्हिडिओमध्ये सुंदरराजन म्हणाले आहेत (Cotton Candy Banned Reason) की, पॉंडिचेरीमध्ये लहान मुले आणि इतर लोकं खात असलेल्या कॉटन कँडीमध्ये 'रोडामाइन बी' नावाचा विषारी पदार्थ वापरला जात असल्याचं आढळून आलं आहे.

आम्ही अधिकाऱ्यांना अशा दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कॉटन कँडी विकणाऱ्या दुकानांची देखील तपासणी केली जाणार आहे. या कॉटन कँडीजमध्ये विषारी पदार्थ आढळल्यास ते जप्त केले जाणार आहेत. तोपर्यंत मुलांनी या कॅंडीज खाऊ नयेत, पालकांनीही याची काळजी घ्यावी, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT