Corona Vaccination Saam tv
देश विदेश

Corona Vaccine: कोरोनाच्या लसीमुळे लोकांचा अचानक मृत्यू होतोय का?, AIIMS च्या अभ्यासात सत्य आलं समोर

Corona Vaccination: कोरोनाच्या लसीमुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पण खरंच या मृत्यूला कोरोनाची लस कारणीभूत ठरते का? यावर AIIMSने केलेल्या अभ्यासातून सत्य समोर आलं.

Priya More

कोरोनाच्या लसीमुळे लोकांचा अचानक मृत्यू होत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील होते. पण आता केंद्रीय कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने बुधवारी कोरोना लस आणि हृदयविकारामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध नाही असे स्पष्टपणे सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) यांनी केलेल्या सखोल अभ्यासाच्या आधारे आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

कोरोना आजारानंतर अनेकांचा चालताना, फिरताना, नाचताना तर कधी गाताना मृत्यू झाला. याबाबतचे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ समोर येत आहेत. या मृत्यूमागे कोरोना लस जबाबदार असल्याचा संशय अनेकांना होता. पण या मृत्यूचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगितले की, 'आयसीएमआर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) यांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील कोरोना लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. गंभीर दुष्परिणामांची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूसाठी अनेक घटक असू शकतात. यामध्ये अनुवंशशास्त्र, जीवनशैली, काही शारीरिक समस्या आणि कोरोनानंतरच्या गुंतागुंत यांचा समावेश आहे.

शास्त्रज्ञांनी पुढे असे देखील सांगितले की, कोरोना लस आणि लोकांचा अचानक झालेला मृत्यू यांना जोडणारी विधाने खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत. तज्ज्ञांनी याचे समर्थन केलेले नाही. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांच्या अचानक मृत्यूंना समजून घेण्यासाठी आयसीएमआर आणि एनसीडीसी यांनी एक अभ्यास केला. संशोधन दोन वेगवेगळ्या प्रकारे केले गेले. एक जुन्या डेटावर आधारित आणि दुसरा रिअल-टाइम तपासणीवर आधारित आहे पहिला अभ्यास मे ते ऑगस्ट २०२३ या कालावधीदरम्यान करण्यात आला. या अभ्यासात १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला. यामध्ये, ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान निरोगी दिसणारे आणि अचानक मृत्यू झालेल्या लोकांची तपासणी करण्यात आली.

तर, दुसरा अभ्यास एम्स आणि आयसीएमआर करत आहेत. या अभ्यासातून तरुणांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूमागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. डेटाच्या सुरुवातीच्या विश्लेषणातून असे दिसून आले की हृदयविकाराचा झटका किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन हे अचानक होणाऱ्या मृत्यूंचे सर्वात मोठं कारण आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत कारणांच्या पद्धतीत कोणताही मोठा बदल दिसून आलेला नसल्याचे या अभ्यातून समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT