Corona Alert: कोरोना पुन्हा पसरतोय, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला; केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना

Corona Virus News: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बुधवारी महत्वाची बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
coronavirus new variant increase in india health minister mansukh mandaviya reviews situation kerala maharashtra delhi all state
coronavirus new variant increase in india health minister mansukh mandaviya reviews situation kerala maharashtra delhi all state saam tv
Published On

Coronavirus New Variant

कंट्रोलमध्ये आला असं म्हणता-म्हणता कोरोना व्हायरसने पुन्हा देशात हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील २९२ प्रकरणे केरळमधील आहेत. हीच बाब लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बुधवारी महत्वाची बैठक घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

coronavirus new variant increase in india health minister mansukh mandaviya reviews situation kerala maharashtra delhi all state
Mumbai News: अंतर्वस्त्रात लपवून आणले ९ कोटींचे ड्रग्ज; महिलेची झाडाझडती घेताच अधिकारीही चक्रावले

या बैठकीत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत (Corona Virus) सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सर्व राज्यांचे आरोग्यामंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थिती होती. कोरोनाच्या नवा व्हेरियंट झपाट्याने पसरतोय त्यामुळे सर्व राज्यांनी सतर्क राहायला हवं, पण घाबरण्याची गरज नाही, मंत्री मनसुख मांडविया म्हणाले.

बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना दर 3 महिन्यांनी एकदा सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क (Coroana Mask) घालावा. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासनही आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना दिले आहेत.

आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, 'आता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून एकमेकांसोबत काम करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी आपआपल्या राज्यातील रुग्णालयाची दर ३ महिन्यांनी आढावा घ्यावा. सणासुदीच्या काळात थंडीची परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात याव्यात.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील सर्व नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन देखील केले आहेत. सणासुदीच्या काळात बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्कचा वापर करावा. घाबरण्याची गरज नाही, असंही मांडविया यांनी म्हटलं आहे.

coronavirus new variant increase in india health minister mansukh mandaviya reviews situation kerala maharashtra delhi all state
Political News: २० वर्षांपासून मी असा अपमान सहन करतोय; 'मिमिक्री'वर PM मोदींची तीव्र नाराजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com