Corona Death: भारतात कोरोनामुळे 11 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू; अमेरिकन अभ्यासकांचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळला

Corona Death: कोरोनाने भारतासह अख्या जगात थैमान घातलं होतं. कोरोनाने लाखो जणांचा बळी घेतलाय. कोविडने किती लोकांचा मृत्यू याचा दावा करणारा एक अहवाल अमेरिकेतील एका जनर्नलमध्ये प्रकाशित झालाय. मात्र येथे करण्यात दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळला.
Corona Death: भारतात कोरोनामुळे 11 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू; अमेरिकन अभ्यासकांचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळला
Corona DeathYandex
Published On

भारतात कोविड-19 महामारीच्या काळात 2020 मध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचा दावा एका संशोधन अहवालात करण्यात आलाय. यूएस-आधारित शैक्षणिक जर्नल सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये हा संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. अहवालावर केंद्रीय मंत्रालयाने आक्षेप नोंदवत फेटाळलाय.

प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अभ्यासानुसार, भारतात 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 17 टक्के जास्त किंवा 1.19 दशलक्ष अधिक मृत्यू झालेत. जे भारतातील कोविड मृत्यूच्या अधिकृत संख्येपेक्षा आठ पटीने जास्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजापेक्षा हा आकडा 1.5 पट जास्त असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आलाय. याच दाव्यावरुन केंद्रीय मंत्रालयाने प्रश्न उपस्थित करत अभ्यासकांचा दावा फेटाळून लावलाय. या अभ्यासाचे अंदाज "असक्षम आणि अस्वीकार्य" आहेत आणि लेखकांनी वापरलेल्या पद्धतीमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं मंत्रालयाने म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com