COVID-19 News: कोविड लसीमुळे भारतात हृदयविकाराचे रुग्ण वाढले? ICMR च्या अहवालात धक्कादायक माहिती येणार समोर?

कोविड लसीमुळे लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे? या प्रश्नचं उत्तर आता ICMR शोधात आहे
COVID-19 News
COVID-19 NewsSaam TV
Published On

Increase in Heart Attacks Due to COVID-19 Vaccines: कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ष २०१९ मध्ये चीनमध्ये थैमान घातल्यानंतर हा विषाणू जगभर पसरला. वर्ष २०२० पर्यंत अनेक देशांनी कोविड विषाणूमुळे होत असलेली जीवितहानी पाहून लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अनेक देशांनी या आजाराची लस शोधून काढली. यातच २०२१ पर्यंत भारतातही लोकांना लसीकरण केले जाऊ लागले. मात्र यासोबतच हृदयविकाराच्या घटनांमध्येही अचानक वाढ झाल्याचे दिसून आले.

COVID-19 News
Maharashtra Recruitment News: महाराष्ट्रात ५ महिन्यांत तब्बल ८८००० तरुणांना नोकरी

एप्रिल २०२१ मध्ये भारतात कोरोनाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. त्याचवेळी सामान्य लोकांसाठी लसीकरण सुरू झालं होतं. या काळात देशभरात अनेकांचा मृत्यू झाला. काहींचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला तर काहींचा हृदयविकाराचा झटका आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला. यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले की, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी बनवलेल्या लसीमुळे लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे? (Latest Marathi News)

ICMR करतोय अभ्यास

लसीमुळे (Covid Vaccine) लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे? या प्रश्नचं उत्तर आता ICMR शोधात आहे. याबाबत अभ्यास करून ICMR आपला अहवाल जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करणार आहे. या अभ्यासात ICMR भारतातील तरुण लोकसंख्येमध्ये कोविड-१९ लसीकरण आणि वाढत्या हृदयविकाराचा झटका यांच्यातील दुवा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

COVID-19 News
BMC Election: 'तुम्ही गेले पंधरा वीस वर्ष महापालिकेवर दरोडा टाकला', शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

पूर्ण खात्री झाल्यावरच अहवाल सार्वजनिक केला जाईल

या अभ्यासाचा प्राथमिक अहवाल काही काळापासून प्रलंबित आहे. हा प्रकाशित करण्यापूर्वी ICMR आतापर्यंत समोर आलेल्या निष्कर्षांचा आढावा घेत आहे. ICMR या अहवालाचा सखोल अभ्यास करत आहे. त्यामुळे त्याची पूर्ण खात्री झाल्यावरच त्याची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे.

ICMR घेत आहे या प्रश्ननांचा शोध

ICMR हृदयविकाराचा झटका आणि कोविड-19 लसीकरणाशी त्यांचा संबंध आहे का? yacha अभ्यास करत आहे. याशी sanabdht या mahtvachya प्रश्नाचं ICMR उत्तर शोधात आहे.

१. लसीकरणानंतर लोकांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे का?

२. मृत्यूला कोविड लस जबाबदार होती का?

३. कोविडच्या गंभीर अवस्थेत आपला जीव गमावलेला रुग्ण बराच काळ त्रस्त होता का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com