Corona Medicine
Corona MedicineSaam tv

Corona Medicine : कोरोना औषधांचा बाजारात तुटवडा; कंपन्यांकडून उत्पादन कमी

Pimpri Chinchwad News : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात राज्यात अधिक रुग्ण असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
Published on

पिंपरी चिंचवड : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोना आजारासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा राज्यात जाणवू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना औषधांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात राज्यात अधिक रुग्ण असून मोठ्या शहरांमध्ये रुग्ण संख्या अधिक आहे. यातच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काहींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या औषधींचा साठा लवकर उपलब्ध होत नसून राज्यात तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे. 

Corona Medicine
Latur : सावधान! लातूरमध्ये घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह; मानवालाही होऊ शकते संक्रमण, ३० घोड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी रवाना

कंपन्यांकडून उत्पादन कमी 

दरम्यान कोरोना आजारासाठी लागणारा औषधा राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावा; अशी मागणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ऑफ पुणे यांनी केली आहे. सध्या डॉक्टर कोरोना रुग्णांना फॅविपिराविर', 'मोल्नुपिराविर' आणि 'पॅक्स्लोविड' या गोळ्या लिहून देत आहेत. मात्र कोरोना आजाराची पहिली आणि दुसरी लाट गेल्यानंतर औषध उत्पादक कंपन्यांनी कोरोना आजारासाठी लागणाऱ्या औषधांचा उत्पादन कमी केल्याने बाजारात कोरोना आजारांच्या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

Corona Medicine
Lightning Strike : पाणी पिण्यासाठी झाडाखाली बसताच घडले दुर्दैवी; वीज अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर 

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी औषधांसाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि अन्न व औषध विभाग प्रशासनाने या प्रकरणात विशेष लक्ष घालून कोरोना आजारासाठी लागणारी औषध बाजारात तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ऑफ पुणे यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com