Congress Meeting
Congress Meeting  Saam Tv
देश विदेश

एक कुटुंब एक तिकीटाच्या निर्णयावर काँग्रेसचे एकमत; काँग्रेस घेणार मोठा निर्णय

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : चार राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस (Congress) आता पक्षात महत्वपूर्ण बदल करत आहे. राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस काँग्रेसची चिंतन बैठक होणार आहे. काँग्रेस पक्ष आता पक्षात काही नियम तयार करणार असल्याचे बोलले जात आहे. यात वयाच्या मुद्दापासून ते एकाच कुटुंबातील किती सदस्यांना तिकीट दिलं जाणार यावरही चर्चा होणार आहे. एकाच कुटुंबातील एका सदस्यालाच तिकीट मिळणार यावर सर्वांनी सहमती दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. या नियमात गांधी परिवाराला सुट देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या शिबिराची सुरुवातील काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी भाषण करुन करणार आहेत. यासह सहा नेते चर्चा करणार आहेत, आणि त्यानंतर काढलेल्या निष्कर्षाला काँग्रेस कार्यकारिणी १५ मे रोजी 'नवीन ठराव' म्हणून मान्यता दिली जाणार आहे.

शिबीराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी (Rahul Gandhi) संबोधित करणार आहे. पाच राज्यांच्या पराभवानंतर काँग्रेस महत्वपूर्ण बदल करत आहे. या शिबिरात काँग्रेसचे देशभरातून ४०० पेक्षा अधिक पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या शिबीरात राज्यसभा सदस्यांसाठी वयोमर्यादेवर चर्चा करत आहे. या चिंतन शिबिरात पक्षातील किमान निम्मी पदे ५० वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव मानली जातील, असे बोलले जात आहे.

या निर्णयावर पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेस (Congress) पक्षात आता युवकांना स्थान देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे काँग्रेस आता युवकांना संधी देणार असल्याचेही बोलले जात आहे. २०१४ मध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस आता एक परिवार एक तिकीट असा नियम करणार असल्याचेही बोलले जात आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यामुळे काँग्रेस आता महत्वपूर्ण बदल करणार आहे. पक्षात युवकांना स्थान देणार आहे. यामुळे काँग्रेसची (Congress) राजस्थानमध्ये होणारी बैठक महत्वपूर्ण असल्याची मानली जात आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT