Vishal Gangurde
बहुतेक जण सकाळी नाश्त्यात इडली खातात. इडली सांबार हा अनेकांचा आवडत्या नाश्त्यापैकी एक आहे.
तुम्ही पोहा इडलीची चव घेतली आहे का, जाणून घ्या या नाश्त्याची रेसिपी
एका भांड्यात २०० ग्रॅम तांदूळ, ४० ग्रॅम उडीद डाळ, 1/4 चमचे मेथीचे दाणे घ्या. त्यास दोनदा धुवा. पुढे २.५ कप पाण्यात भिजवा.
१ कप जाड पोहे एका भांड्यात घ्या. त्या पोह्याला दोनदा धुवा.
या पोह्यामधील पाणी काढा. त्यानंतर त्यात तांदूळ, उडीद डाळ, मेथीदाणे आणि पाणी घाला. पुढे एकत्र करा.
हे मिश्रण सुमारे ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर पूर्णपणे गाळून घ्या. भिजलेले मिश्रण पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात बारीक करा.
बारीक केलेल्या मिश्रणात बेकिंग सोडा घाला. त्यानंतर इडलीच्या साच्याला तेल लावा.
इडलीच्या भांड्यात पीठ घालून इडली १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्या. पोहा इडली चिकट नसावी. त्यानंतर इडली तयार झाली असेल.
पोहा इडली नारळ आणि सांबारसोबत सर्व्ह करा.
Next : डाएट आणि जिम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा