Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (२ may 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, लोकसभा निवडणुकीशी संबंधित बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर
२ May 2024 Latest Updates on Salman Khan, PM Narendra Modi and overall Maharashtra
२ May 2024 Latest Updates on Salman Khan, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

Lok Sabha Election : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला 

महायुतीचा पालघरमधील जागेचा तिढा सुटलाय. पलघरची जागा भाजपकडून घोषित करण्यात आलीय. माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार शहरात सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा कोल्हापूर वारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांसाठी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार

उद्या दुपारी मुख्यमंत्री काही वेळासाठी कोल्हापुरात दाखल होणार

उद्या सायंकाळी मुख्यमंत्री बेळगाव सीमा परिसरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार

4 आणि 5 मे रोजी मुख्यमंत्री कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघ इथं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या निमित्ताने स्वतः उपस्थित राहणार

Maharashtra Politics : एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरे शब्द बदलणार नाहीत; जयंत पाटील

अनेक जण माझी सोशल मीडियात मापे काढत आहे.

काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेनाला,का दिली ? असं मी विचारु शकतो ,पण मी विचारणार नाही..

तो काँग्रेस आणि शिवसेने मधील प्रश्न आहे.

पण शेवटी जो निर्णय तो आम्ही मान्य केला...

उद्धव ठाकरे यांचा निर्णय झाला की एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरे शब्द बदलणार नाहीत

पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

चंद्रहार पाटील - मविआ मध्ये बंड व्हायला नको हवे होते

जे कॉंग्रेसची उमेदवारी मिळेल म्हणून नाचत होते त्यांना उमेदवारी पक्षाने डावलले

मदन पाटील यांचा जिल्हा बँकेत, विधानसभेत कसा पराभव केला, पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला आणि कुणी केला आणि सांगलीला माहिती आहे

वसंत दादांचं नाव घेऊन नेहमी भाषणाला सुरुवात केली जाते

प्रामाणिकपणे बंडखोरी केली असती तर ती जनतेने स्वीकारली असती

भाजपचं मोठं पाकीट घेऊन शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी विशाल पाटील प्रयत्न करत आहेत

राजकारण माझ्यासाठी नवं नाही, चंद्रहार पाटील सांगलीतून गरजले

माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तरी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला

माझ्याविरोधात एक नाही तर दोन उमेदवार उभे राहिले, पण माझ्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही

राजकारण माझ्यासाठी नवं नाही

35 वर्षानंतर सांगलीला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली

निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट. अण्णा हजारे यांची भेट घेऊन दोन्ही उमेदवारांनी घेतले आशीर्वाद. दरवर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार अण्णा हजारे यांच्या भेटीला जाऊन घेत असतो आशीर्वाद..

मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

नवी मुंबईतील भाजप नाराजी नाट्य

राजीनामा देणारे गणेश नाईक समर्थक

मूळ भाजपच्या एकाही नगरसेवकाने आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही

नाईकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेल्या लोकांनीच राजीनामे दिलेत

मीरा भाईंदरच मधून राजीनामा देणारे ही नाईक समर्थक

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला खुलासा

यापूर्वी ही राष्ट्रवादीत असताना अश्याच पधतीने या लोकांनी राजीनामे दिले होते

आजारपणात नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना फोन करून विचारपूस करायचे; देवेंद्र फडणवीस

लोकांनी देशांमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याचे मन बनवले आहे संजय मंडलिक यांना खासदार बनवण्याचे नागरिकांनी ठरवले आहे

देशासमोरचे नाही तर त्यांच्या पक्षासमोरचे नरेंद्र मोदी हे संकट आहेत

अजितदादा आमच्या सोबत आहेत त्यामुळे नक्कीच शरद पवार यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे

जनता याचे उत्तर मतपेटीतून देईल

राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात मात्र अडचणीच्या काळात आजारपणाच्या काळात विचारपूस करणे मदत करणे ही आपली संस्कृती आहे

नरेंद्र मोदी हे नेहमी पाळतात नरेंद्र मोदी हे त्या काळात नियमितपणे उद्धव ठाकरे यांची फोन करून विचारपूस करत होते

लोकल ट्रेनमध्ये नशेखोर तरुणांच्या हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकलमध्ये 27-28 एप्रिल च्या मध्यरात्री तीन ते चार नशेखोर तरुणांनी हैदोस घातला होता, या तरुणांनी लोकल डब्यात बसलेल्या प्रवाशांच्या मोबाईल आणि सोन्याच्या चैनी खेचण्याचा प्रयत्न केला. आणि जे प्रवासी त्यांना विरोध करत होते त्यांना ते पट्ट्याने तसेच चाकूचा धाक दाखवून मारहाण करत होते, यावेळी त्याच लोकलच्या डब्यात शहापूर जवळील साजिवली गावात राहणारे दत्तात्रय भोईर प्रवास करत होते, त्यांनी या नशेखोर तरुणांना विरोध केला,तेव्हा एका तरुणाने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला आहे.

रवींद्र वायकर यांच्यासाठी महायुतीचे उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन

शक्तीप्रदर्शन करत रवींद्र वायकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार

सकाळी 10 वाजता रॅलीला होणार सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

सोबतच महायुतीच्या इतर पक्षातील मोठे नेतेही राहणार उपस्थित

म्हाडा कार्यालय प्रवेशद्वार ते वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान भव्य महारॅलीचे आयोजन

वायकर सकाळी 8 वाजता जोगेश्र्वरी शाम नगर तलावाजवळील गणपती मंदिरात दर्शन घेणार आहेत

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना भाजपचा मोठा झटका

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना भाजपचा मोठा झटका

BJP ने बृजभूषण सिंह यांचं तिकीट कापल

बृजभूषण यांचा मुलगा करण याला भाजपकडून तिकीट जाहीर

कैसरगंज मतदार संघातून भाजपने कापलं तिकीट

महिला कुस्ती खेळाडूंनी ब्रीजभूषण वर केले होते गंभीर आरोप

Maharashtra Politics 2024 :  छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागात जाहीर सभा.

सायंकाळी 5 वाजता खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगांव आणि सायंकाळी 7 वाजता

गंगापूर तालुक्यातील रांजणगांव शेणपुंजी येथे सभा

Lok Sabha Election : नवी मुंबईतील भाजपचे 300 ते 400 पदाधिकारी देणार राजीनामा, तिकीट वाटपावरून नाराज असल्याची चर्चा

नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी तिकीट वाटप वरुन नाराज

300 ते 400 पदाधिकारी देणार राजीनामा

भाजप पदाधिकारी राजीनामा घेऊन मुंबईकडे रवाना

मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन देणार राजीनामा

नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते नाराज

नवी मुंबईतून भाजप पदाधिकारी मुंबईकडे रवाना

मुंबईतील भाजप येथील कार्यालयात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन देणार राजीनामा

परभणीत रोजगार हमीतील संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयात प्राशन केलं कीटकनाशक

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे खोदकाम मजुरांमार्फत न करता जेसीबीच्या साह्याने केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मानोली येथील दोघांनी पंचायत समिती कार्यालय मानवत येथे किटनाशक औषध प्राशन केल्याचा प्रयत्न केला. सदाशिव शिंदे सुरेश मांडे असे या दोघांची नावे आहेत, दोघांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर मानवत रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी परभणी रुग्णालयात नेण्यात आलंय. गावाचे सरपंच ग्रामरोजगार सेवक या अनागोंदी कारभाराला जबाबदार असल्याचा आरोप दोघांनी केलाय.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिना गावित व सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

नंदुरबार व अहमदनगरमध्ये ७ मे रोजी पंतप्रधानांच्या जाहीर सभा

नंदुरबारनंतर १० मे रोजी मोदींची बीडमध्ये सभा

Maharashtra Politics 2024 : 60 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदींनी 10 वर्षात केलं; एकनाथ शिंदेंचा दावा

अर्ज भरायला महायुतीची प्रचंड अशी रॅली आपण पाहिली

महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील

नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे

महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते कार्यकर्ते आज रॅलीमध्ये कडाक उन्हातही रॅलीमध्ये सहभागी झाले होते

यावरून आपण अंदाज लावू शकता की हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे

काँग्रेसला जे 50 -60 वर्षात काम करता आलं नाही ते मोदींनी दहा वर्षात केलं

देशाला विकासाकडे नेण्याचे काम केलं

राज्यात महायुती सरकारने देखील सर्वसामान्यांसाठी जे काम केलंय त्याची पोचपावती या निवडणुकीत नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे

Maharashtra Election: आढळराव पाटलांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी: अमोल कोल्हे

व्यवसाय संदर्भात एकही संशोधित प्रश्न विचारला नसल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रतिउत्तर दिलय. मी पुरावे दाखवतो आढळराव पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला पडण्याची तयारी ठेवा, असं खुलं आव्हान अमोल कोल्हे यांनी दिला आहे ते साताऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारात सभेसाठी आले असताना बोलत होते

Loksabha Election : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

आज नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार आहेत. गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Accident: अंबाजोगाई रिंग रोडवर कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक पलटी

बीडच्या अंबाजोगाई रिंग रोडवर कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचं मोठं नुकसान झालंय. गंगाखेडहून कापसाच्या गाठी कोल्हापूरला घेऊन जाणारा ट्रक अंबाजोगाई रोडवर पोहोचला असता दिशादर्शक फलक नसल्याने चालकाला अंदाज आला नाही. आणि यातच सदरील ट्रक पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune Crime : पुणे पोलिसांकडून १०९ पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आणखी एक परेड

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांची मोठी कारवाई केलीय. पुणे शहरातील तब्बल १०९ पोलीस चौकींमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड काढण्यात आली. पुणे शहरात गेल्या पाच वर्षापासून रेकॉर्डवर असणाऱ्या १००० पेक्षा अधिक गुन्हेगारांची परेड काढण्यात आलीय. आज पुणे शहरातील १०९ पोलीस चौकीमध्ये रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांना बोलवून त्यांना तंबी देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तालयात परेड काढली होती.

Ahmednagar bus fire : अहमदनगर जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग

खाजगी बसला भीषण आग...

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील घटना...

निर्मळ पिंप्री येथील हॉटेलसमोर बसला भीषण आग...

जेवणासाठी थांबली होती खाजगी बस

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही...

Amit Shah : अमित शहा बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरण : कोर्टाने कारवाईची याचिका फेटाळली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कथित बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.

निवडणूक आयोगाला असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. मात्र निवडणूक सुरू असताना अशा प्रकारे निर्देश देता येणार नाही, असं म्हणत याचिका फेटाळली.

वकिल जयंत मेहता यांच्या मार्फत वकिलांच्या संघटनेनं ही याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमुर्ती मनमीत अरोडा यांच्या खंडपीठाने फेटाळली याचिका

Dindori : ठरलं! भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

- दिंडोरी लोकसभेत महत्त्वाची राजकीय घडामोड

- भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी

- दिंडोरी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणार

- हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना

- २०१९ ला हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना देण्यात आली होती उमेदवारी

Satara : कराडमध्ये केमिकल गॅसच्या टँकरला गळती

कराड चिपळूण राज्य महामार्गावर केमिकल गॅसच्या टँकरला गळती

पाटण तालुक्यातील घाटमाथा गावचा हद्दीतील घटना

सकाळी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण हवेत धुराचे लोळ

घटनेच्या ठिकाणांपासून आसपास राहणाऱ्या लोकांना गॅसच गळतीचा त्रास

अग्नीशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल

घाटमाथा येथील पोलीस चौकीत घटनेची नोंद

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केला जाणार आहे. महायुतीमधील शिवसेना, भाजप मनसे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या रॅलीत सहभागी होणार आहे .

Aaba Bagul : नाराज आबा बागुल काँग्रेस रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात

काँग्रेसमध्ये नाराज असलेले आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर याच्या प्रचारात उतरले

गेले काही दिवसांपासून आबा बागुल काँग्रेसमध्ये नाराज होते.

लोकसभेच्या उमेदवारीवरून आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Dharashiv : धाराशिवमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा

धाराशिवमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा होणार

वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आलां आहे.

शहरातील मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावर दुपारी 12 वाजता होणार सभेला सुरूवात होईल.

40 ते 50 हजार लोक सभेला येणार असल्याचा आयोजकांचा दावा आहे.

वंचितकडून सभेची जोरदार तयारी पूर्ण तर लोकांना बसण्यासाठी खुर्च्यांची केली सोय

Delhi News : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महिला आयोग केलेल्या नियुक्त्या नायब राज्यपालांकडून रद्द करण्यात आल्या आहेत.

दिल्ली महिला आयोगाच्या २३३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे.

नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशाने तत्काळ कारवाई झाली.

दिल्ली राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे.

Konkan Politics : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र दोन दिवस कोकणात

राणेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांच्या सभा

उद्धव ठाकरे यांची उद्या शुक्रवारी नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत जाहीर सभा

तर शनिवारी आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे जाहीर सभा होणार

उद्या 3 मे रोजी आदित्य ठाकरे यांची मुरुड आणि मंडणगड येथे जाहीर सभा होणार

तर 4 मी रोजी चिपळूण आणि सावंतवाडीत आदित्य ठाकरे यांच्या सभा होईल

Ratnagiri Diva Passenger : रत्नागिरी- दिवा पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

रत्नागिरी- दिवा पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

चिपळूण जवळच्या सावर्डे रेल्वे स्थानकाजवळील ही घटना घडली.

दुसरं इंजिन बोलावून गाडी पुन्हा मार्गस्थ

इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला.

कोकण रेल्वेवरची वाहतूक सुरळीत असल्याचा कोकण रेल्वेचा दावा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सांगलीत जाहीर सभा

सायंकाळी 6 वाजता सांगलीच्या नेहरुनाथनगर कल्पद्रुम मैदानात सभा

सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे.

भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे.

Pune News :  पुण्यात अग्नितांडव! काल रात्री ३ ठिकाणी लागली आग

पुणे शहरात काल राञी शहरात आगीच्या तीन घटना.

सिहंगड रोड, वडगाव बुद्रुक येथे इमारतीत पाचव्या मजल्यावर घरामध्ये आग तर भवानी पेठेत गोकुळ हार्डवेअर या दुकानात आग आणि कोंढवा बुद्रुक येथे ही दुकानांना आग लागली.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

जखमी आणि जीवितहानी नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.