तुम्ही दोनदा पंतप्रधान झालात, अजून काय हवंय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

PM Narendra Modi : मोदींनी सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
PM Narendra Modi
PM Narendra ModiSAAM TV
Published On

गुजरात : 2014 मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर 2019 मध्येही नरेंद्र मोदी (PM Nardendra Modi) यांनी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अलिकडेच मोदींनी याबाबतचा एक किस्सा ऐकवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील (Gujrat) भरूचमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 'उत्कर्ष समरोह'ला संबोधित केले. या समारोहात मोदींनी विरोधी पक्षातील एका नेत्यासोबत घडलेला एक प्रसंग आवर्जून सांगितला. दरम्यान, मोदींनी सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (PM Narendra Modi Latest Marathi News)

PM Narendra Modi
सर्वसामान्यांची होरपळ! महागाईने गाठला कळस; ८ वर्षांतील उच्चांकी

उत्कर्ष समारोह सुरू असताना मोदींनी एक किस्सा सुनावला मोदी म्हणाले की, एकदा विरोधी पक्षातील एक ज्येष्ठ नेते त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी गोष्टींमुळे त्यांच्या मनात थोडी नाराजी होती, त्यावेळी ते म्हणाले, मोदीजी काय करायचे... देशाने तुम्हांला दोनदा पंतप्रधान केले... आता काय करायचे...? असा प्रश्न त्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाचं मोदींनी पटकन उत्तर देत समाधानही केलं होतं.

मोदी म्हणाले की, 'मी दोनदा पंतप्रधान झालो तर खूप काही घडले मी खूप काही कमावलं असं त्यांना वाटायचं, पण त्यांना हे माहिती नाहीये की मी वेगळ्याच मातीत जन्माला आलोय. या गुजरातच्या भूमीने मला तयार केले आहे, त्यामुळे आतापर्यंत मी जे काम केलं ते चांगलं केलं आता आराम करूया, असा माझा दृष्टीकोन नाहीये. मी एक वेगळं स्वप्न बघितलं आहे. 2014 मध्ये जेव्हा जनतेनं आम्हाला सेवेची संधी दिली. तेव्हा देशातील निम्मी लोकसंख्या स्वच्छतागृह, लसीकरण सुविधा, वीज कनेक्शन सुविधा, बँक खाते या सुविधांपासून वंचित होती. आता सर्वांच्या प्रयत्नांमुळे आम्ही या अनेक योजना 100 टक्के पूर्ण करण्याचा संकल्प करत आहोत. हे माझे स्वप्न आहे आणि जोवर हे उद्दिष्ट साध्य होत नाही, तोवर मी माझे स्वप्न बदलणार नाही'

दरम्यान, पुढे बोलतांना मोदी म्हणाले, 'मी आधीही म्हटले होते की, अशी कामे अवघड असतात, राजकारणीही या कामांमध्ये हात घालायला घाबरतात. मात्र मी राजकारण करण्यासाठी नाही, तर देशवासीयांची सेवा करण्यासाठी आलो आहे. सरकारी योजनांची 100 टक्के अंमलबजावणी झाल्याने भेदाभेद संपतील, त्याचबरोबर लाभ मिळ‌विण्यासाठी शिफारस करण्याची गरजही संपेल. कारण, आपल्याला लाभ मिळणारच आहे, याची खात्री लोकांना वाटेल. तुष्टीकरणाचे राजकारणही यामुळे संपुष्टात येईल,' असे मोदी म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com