Senior Congress leader Deepak Babaria passes away after a prolonged illness; Rahul Gandhi and other party leaders express grief. saam tv
देश विदेश

काँग्रेसचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड, राहुल गांधींनी केले दु:ख व्यक्त; राजकारणात हळहळ

Deepak Babaria Death News And Rahul Gandhi Condolence Message: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणा व मध्य प्रदेशचे माजी प्रभारी दीपक बाबरिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी शोक व्यक्त केला.

Omkar Sonawane

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणा तसेच मध्य प्रदेशचे माजी प्रभारी दीपक बाबरिया यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. तयांच्या निधनाच्या वृत्ताने काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बाबरिया यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दीपक बाबरिया काँग्रेसचे माजी सरचिटणीस होते. त्यांनी हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळाली होती. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते.

ऑक्टोबर 2024 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बाबरिया यांनी हरियाणाच्या प्रभारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत बोलताना त्यांनी मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला जबाबदारी देण्याची विनंती केली होती. माझी प्रकृती ठीक नाही आणि निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही माझी नैतिक जबाबदारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले होते. याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर सोपवला होता.

काँग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली

दीपक बाबरिया यांच्या निधनानंतर काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत बाबरिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वजण त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही बाबरिया यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी बाबरिया यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न निघणारं नुकसान असल्याचं म्हटलं. पक्ष संघटनेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि काँग्रेसला बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधींसह इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

बदलापूरमध्ये पाणी संकट; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या सोसायटीत कधी असणार पाणी बंद?

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

Garba Hairstyles: गरबा दांडियासाठी ट्राय करा 7 ट्रेंडी हेअरस्टाईल, ट्रेडिशनल लूकला येईल मॉडर्न टच

SCROLL FOR NEXT