congrerss Saam tv
देश विदेश

काँग्रेसने कंबर कसली, पक्षात मोठा उलटफेर; ३९ नेत्यांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

congress political news update : काँग्रेस पक्षात मोठा उलटफेर झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ३९ नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Vishal Gangurde

काँग्रेसकडून संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू

पक्षात ३९ जणांना दिली नवी जबाबदारी

नव्या नियुक्तीमुळे पक्षात मोठा उलटफेर

काँग्रेसने पुन्हा एकदा संघटनेच्या वाढीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारी १२ नवे उपाध्यक्ष आणि २७ महासचिवांची नियुक्ती केली. काँग्रेसच्या नव्या नियुक्तीमुळे पक्षात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे.

काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल म्हणाले, 'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी समिती, अनुशासन समितीच्या उपाध्यक्ष, महासचिवांच्या नियुक्तीला तात्काळ मंजुरी दिली आहे.

कार्यकारी समितीच्या नियुक्त सदस्यांमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्ख्यू , उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या व्यक्तीरिक्त वरिष्ठ नेते आशा कुमारी, कर्नल धनी राम शांडिल, विल्पव ठाकूर, कौल सिंह ठाकूर,चंद्र कुमार, कुलदीप कुमार आणि कुलदीप सिंह राठौर यांचा समावेश आहे.

कार्यकारी समितीत या नेत्यांचा समावेश

समितीत मंत्री हर्षवर्धन चौहान, जगत सिंह नेगी, रोहित ठाकूर, अनिरुद्ध सिंह, विक्रमादित्य सिंह यांच्या व्यतिरिक्त राजेश धर्माणी, यादविंदर गोमा, राम लाल ठाकूर, गंगू राम मुसाफीर आणि अनीता वेन्ना यांच्या नावाचा समावेश आहे.

उपाध्यक्षपदाची जबाबदारी कुणाला मिळाली?

काही नेत्यांवर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रकाश चौधरी, नीरज भारती, बंबर ठाकूर, सतपाल रायजादा, रजनीश किमटा, पारस राम, मोहिंदर चौहान, जीवन ठाकूर, करण सिंह पठानिया, अमित नंदा आणि चेत राम ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच मदन चौधरी यांना कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT