उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांची शिवसेनेत एन्ट्री

eknath shinde news : एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत एन्ट्री केली आहे.
eknath shinde
eknath shinde news : Saam tv
Published On
Summary

बुलढाण्यातील चिखलीत शिंदे गटात केला प्रवेश

भाजपसह विविध पक्षांचे कार्यकर्ते शिंदे गटात

पक्ष प्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ

बुलढाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. बुलढाण्यातील चिखली तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपसह विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृ्त्वाखाली पार पडला. मोठ्या पक्ष प्रवेशामुळे चिखलीतील भाजपला मोठे खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे. या राजकीय घडामोडींमुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. संजय गायकवाड यांच्या टीकेने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं.

eknath shinde
Ashok Kharat Case: भोंदू बाबा खरातचा हॉट, कोल्ड रिडींगचा पॅटर्न; महिलांना कसा अडकवायचा जाळ्यात?

चिखली तालुक्यातील तब्बल 30 गावांमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आगामी काळात या मतदारसंघात शिंदे सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. या पक्ष प्रवेशामुळे चिखली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गट, काँग्रेस नेत्याचाही शिंदे गटात प्रवेश

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वीही शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी एन्ट्री झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशीकांत पाटील, कर्जत येथील उद्योजक प्रवीण ढोकरीकर यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

eknath shinde
भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

मुंबईतील जोगेश्वरीतील वॉर्ड क्रमांक ७३ मधील ठाकरे गटाचे यश सावंत, काँग्रेसचे आरिस कांजी, जयेश वैद्य, राज शुक्ला या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाच्या रोजगार विकास मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, शैलेश जयस्वाल, सोनाली फाटक आणि अंधेरी जोगेश्वरी परिसरातील कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com