Sam Pitroda Statement Saam TV
देश विदेश

Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी; लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने केली होती कारवाई

Sam Pitroda news : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून पुन्हा मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्यावर पक्षाने लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठी कारवाई केली होती.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने सॅम पित्रोदा यांना पुन्हा एकदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. सॅम यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर बुधवारी त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे.

पित्रोदा यांनी मे महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस वादात अडकली होती. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी स्वत:ला पक्षापासून वेगळं केलं. यादरम्यान, काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत सॅम पित्रोदा यांनी पद सोडल्याचे जाहीर केले होते. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांनी स्वत:हून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचं अध्यक्षपद सोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता.

सॅम पित्रोदा यांनी काय म्हटलं होतं?

एका मुलाखतीत लोकशाहीवर भाष्य करताना सॅम पित्रोदा यांनी म्हटलं होतं की, 'मागील ७५ वर्षांपासून भारतीय आनंदात राहत आहेत. आपण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एक संघ ठेवू शकतो. ईशान्य भागात राहणारे लोक चीनी लोकांसारखे दिसतात. तर पश्चिमेतील लोक अरेबियन लोकांसारखे दिसतात. उत्तर भागातील लोक गोऱ्या लोकांसारखे दिसतात. दक्षिण भारतातील लोक आफ्रिकेतील लोकांसारखे दिसतात'. भारतात राहणारे लोक वेगवेगळ्या भाषेचे आहेत. त्यांच्या धर्म, जेवण, परंपरेचा आदर करतो, असेही त्यांनी म्हटलं होतं.

'या भारतावर माझा विश्वास आहे. तिथे प्रत्येकाला जागा आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. सॅम यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, सॅम यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाष्य केलं होतं. भारताच्या विविधतेची तुलना करताना अशी उदाहरणे स्वीकारले जाऊ शकत नसल्याचे जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे एकत्र येण्यावरून 'राजकीय काला'! ठाकरेंच्या नेत्यानं मनोरे रचले; शिंदे- फडणवीसांच्या नेत्यांनी फोडली राजकीय हंडी

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

SCROLL FOR NEXT