Rahul gandhi  Saam Digital
देश विदेश

Rahul Gandhi : ...मग पेपरफुटी का थांबवत नाही? राहुल गांधींचा थेट PM मोदींना सवाल, पाहा Video

Rahul Gandhi on paper leak : पेपरफुटीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. राहुल गांधी यांनी पेपरफुटीवरून पंतप्रधान मोदींना थेट सवाल केले आहेत. पेपरफुटी का थांबवत नाही? असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना केला आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून नीट आणि युजीसी नेट परीक्षा फुटीवरून वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट परीक्षा रद्द केली आहे. त्यानंतर नीट परीक्षा रद्द होणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, या पेपर फुटी प्रकरणावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. पेपरफुटी का थांबवत नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.

देशातील पेपरफुटीच्या प्रश्नावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. 'आम्ही भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूरवरून महाराष्ट्रात गेलो. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पेपरफुटीची तक्रार सांगितली. आताही नीट आणि नेट परीक्षाचे पेपर फुटले आहेत. मोदींनी रशिया युक्रेन युद्ध, इस्त्राएल गाजा थांबवलं असे काही लोक म्हणत होते. मग पेपरफुटी मोदी का थांबवत नाही? असा सवाल राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला.

'शिक्षण व्यवस्थेला भाजप आणि त्यांच्या संस्थानी घेरलं आहे. यामुळे देशातील युवकांचं मोठं नुकासान होणार आहे. आता एक परीक्षा रद्द केली आहे. आता दुसरी परीक्षा रद्द करणारी की नाही. काही लोक पकडले गेले आहेत. आता या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल ही अपेक्षा आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत उचलून धरणार आहोत. सोमवारपासून संसदेचं सत्र सुरु होत आहेत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जाब विचारत आहोत. मोदी सरकारला हे सगळ थांबण्यास आम्ही भाग पाडू. पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

'पेपर फुटीच्या घटना घडू नयेत, यासाठी कायदे बनवले पाहिजे. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात या घोटाळ्याचे केंद्र आहेत. देशातील संस्था यांच्या हातून जोपर्यंत काढून घेत नाहीत, तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Bigg Boss Marathi 6 : "तो माझा..."; बिग बॉसच्या घराबाहेर पडताच लावणी क्वीनने पलटी मारली, राधा मुंबईकरने बॉयफ्रेंडविषयी केला मोठा खुलासा

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर काहीच वेळात होणार अंत्यसंस्कार

Gold Rate Today : सोन्याच्या दरवाढीचा स्फोट, एका दिवसात प्रति तोळा ११,७७० रुपयांची वाढ; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Pilot Salary: विमान चालवणाऱ्या पायलटचा पगार किती असतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT