NEET UG Exam: नीट परीक्षा घोटाळा! काउंसलिंगवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; NTAला पुन्हा नोटीस

Supreme Court on NEET UG Exam: आज कोर्टात नीट परीक्षा घोटाळ्या संदर्भात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या. परीक्षा रद्द करून पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.
NEET UG Exam: नीट परीक्षा घोटाळा! काउंसलिंगवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; NTA ला पुन्हा नोटीस
Supreme CourtSaam TV

दिल्ली, ता. २० जून २०२४

पेपर लीक झाल्याच्या वादानंतर अखेर यूजीसी नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत या संदर्भाचा निर्णय जाहीर केला आहे. पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने बंदी घालण्यास नकार दिला दिला आहे.

NEET UG Exam: नीट परीक्षा घोटाळा! काउंसलिंगवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; NTA ला पुन्हा नोटीस
Mumbai Rain Video : मुंबईकरांचे हाल, मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, लोकल ट्रेन उशिराने

याबाबत सविस्तर माहिती अशी की, NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली. मात्र कोर्टाने आज पुन्हा एकदा त्यावर बंदी घालण्यास नकार दिला. परीक्षा रद्द झाल्यास काउंसलिंग आपोआप रद्द होईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

आज कोर्टात नेट परीक्षा घोटाळ्या संदर्भात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या. परीक्षा रद्द करून पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. कोर्टाने आजही NTA ला नोटीस बजावली असून या प्रकरणी 8 जुलै रोजी इतर याचिकांसोबत याही याचिकेवर सुनावणी होणार आहे.

NEET UG Exam: नीट परीक्षा घोटाळा! काउंसलिंगवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; NTA ला पुन्हा नोटीस
Nagpur News : खळबळजनक! नागपूरमध्ये आढळला एअर फोर्सच्या माजी कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृतदेह

दरम्यान, नीट ही देशातील सर्वात मोठी मेडिकल परीक्षा आहे. 4 जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. ज्यावरुन वाद सुरू झाला होता. परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० तर काही विद्यार्थ्यांना 718 आणि 719 गुण मिळाले. ज्यावरुन संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NEET UG Exam: नीट परीक्षा घोटाळा! काउंसलिंगवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; NTA ला पुन्हा नोटीस
Sharad Pawar News: पंतप्रधानांची गॅरंटी खोटी निघाली, भाजप- मोदींच्या विश्वासाला तडा बसला', शरद पवारांचे टीकास्त्र; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com