UGC-NET Exam Cancelled: मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द, अनियमिततेच्या तक्रारीनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

Education Minister's decided to cancelled UGC-NET exam: UGC-NET परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारीनंतर शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने थेट UGC-NET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द, अनियमिततेच्या तक्रारीनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय
UGC-net exam studentANI , file photo

नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने एनटीएमार्फत घेण्यात येणाऱ्या युजीसी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. परीक्षेमध्ये अनियमितता झाल्याचे सांगत शिक्षण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे.

नीट परीक्षेचा निकालाचा वाद ताजा असताना शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट परीक्षा ही नव्याने आयोजित केल्याचे जाहीर केले आहे. तसेच परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारीनंतर सीबीआय या प्रकरणाची तपासणी करणार आहे.

मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द, अनियमिततेच्या तक्रारीनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय
Modi Cabinet Meeting : PM मोदींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये ५ महत्वाचे निर्णय; वाढवण बंदरालाही दिली मंजुरी, महाराष्ट्राला काय मिळालं?

शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं की, 'एनटीएने नेट परीक्षा ही १८ जून २०२४ रोजी देशातील विविध शहरात दोन टप्प्यात ओएमआर मोडवर आयोजित केली होती. या परीक्षेबाबत गृहमंत्रालयाच्या सायबर विभागाला परीक्षेत गडबड झाल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर शिक्षण मंत्रालयाने थेट परीक्षा रद्द केली.

मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द, अनियमिततेच्या तक्रारीनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा

परीक्षेच्या प्रक्रियेची पारदर्शकता आणि शुद्धता सिद्ध करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ही परीक्षा नव्याने आयोजित केली जाईल. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.

एनटीएकडून यूसीजी नेट परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात कॉम्पूटर बेस्ड टेस्ट मोड ऐवजी पेन पेपर मोड पद्धतीने परीक्षा घेतली होती. सहा वर्षांनंतर यूजीसीने नेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली होती.

नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात

मेडिकल प्रवेशाच्या नीट परीक्षेचा वाद अजून सुरुच आहे. त्यात यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे नॅशनल टेस्टिंग एजेन्सीच्या अडचणी वाढल्या आहेत. नीट आणि यूजीसी नेट या दोन्ही परीक्षांच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com