Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती.
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu-Kashmir Encounter
Published On

काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एक एसओजी (जम्मू-काश्मीर पोलीस) जवान जखमी झालाय. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील हदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या घटनेत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाहीये. दरम्यान, या चकमकीत एसओजीच्या एका जवानाला गोळी लागली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.

काही दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरच्या रियासी सेक्टरमध्ये एका बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. मृतकांमध्ये ३ महिलांचा समावेश होता. तर ४१ जण जखमी आहेत. गृह मंत्रालयाने या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवलाय. भाविकांची बस कटरा येथील शिव खोडी मंदिराकडून माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती त्यावेळी दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला होता.

हा हल्ला ९ जून रोजी झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि वार्षिक अमरनाथ यात्रेच्या तयारीचा येथे सलग दोन बैठकांमध्ये आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा
Amit Shah: 'जम्मू काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', दुसऱ्यांदा गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच अमित शहा अॅक्शन मोडवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com