NCERT News : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; NCERT कडून बदलण्यात आले पुढील शब्द

NCERT Books Changes: NCERT इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात 'चीनशी भारताची सीमा आणि परिस्थिती' असा एक धडा आहे. या प्रकरणामध्ये काही शब्दांत बदल झालाय.
NCERT Books Changes
NCERT NewsSaam TV
Published On

NCERT या संस्थेने आपल्या इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकांतील काही शब्द बदलले आहेत. राज्यशास्त्र विषयाच्या अनेक पुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामधील आझाद पाकिस्तान. चीनी घुसखोरी आणि पीओके असे शब्द काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, NCERT इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात 'चीनशी भारताची सीमा आणि परिस्थिती' असा एक धडा आहे. या प्रकरणामध्ये काही शब्दांत बदल झालाय. त्यासह 'कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स' पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये देखील बदल झालाय. या प्रकरणात भारत-चीन संबंध यांच्या जुन्या आशयात दुरुस्ती करण्यात आली आहे.

NCERT Books Changes
Railway Ticket Booking : ट्रेनचं तिकीट बूक करण्यासाठी ब्रोकर्सची मदत घेताय! थोडं थांबा, याविषयी जाणून घ्या

आधीच्या आशयानुसार, भारत-चीन संबंध सीमावादावरून आणि दोन्ही देशांतील लष्करी संघर्षामुळे ती आशा संपुष्टात आली आहे. असा होता. हा अर्थ सुधारीत पुस्तकात भारतीय सीमेवर चीनच्या घुसखोरीमुळे ती आशा संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे.

इतकंच नाही तर १२ वीच्या 'पॉलिटिक्स इन इंडिया फ्रॉम इंडिपेंडन्स' या पुस्तकातून आझाद पाकिस्तान हा शब्द बदलून त्या जागी पाकव्याप्त जम्मू काश्मीर असा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्ताकातील पान क्रमांक ११९ वर असा दावा आहे की, पाकिस्तान या भागाला आझाद पाकिस्तान म्हणतो. मात्र हा मुळात भारताचा भाग आहे, ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे दावा केला आहे, असे काही बदल पुस्तकात करण्यात आलेत.

NCERT Books Changes
NCERT Recruitment 2023: NCERT मध्ये 347 पदांसाठी भरती, उमेदवारांनी असा करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com