NCERT Recruitment 2023: NCERT मध्ये 347 पदांसाठी भरती, उमेदवारांनी असा करा अर्ज

Latest News: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे.
NCERT Recruitment 2023
NCERT Recruitment 2023Saam Tv
Published On

Delhi News: सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीमध्ये (NCERT) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने 347 पदांच्या भरतीसाठी (NCERT Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे.

NCERT Recruitment 2023
Manish Sisodia News: मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत मोठी वाढ; CBI चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच आलं नाव

NCERT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 347 पदं भरली जाणार आहेत. ज्यामध्ये पे-मॅट्रिक्स लेवल 2-5 साठी 215 पदांसाठी भरती केली जाणार आहे. लेवल 6-8 साठी 99 पदं आणि लेवल 10-12 साठी 33 पदं भरली जाणार आहेत. या वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळी पात्रता आहे. नवी दिल्ली येथील NCERT च्या मुख्यालयासाठी तसेच विविध संस्था आणि प्रादेशिक केंद्रांसाठी ही भरती एकाच वेळी केली जात आहे.

NCERT Recruitment 2023
Mobile Blast News: मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! ८ वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर; हातातचं झाला स्फोट अन्...

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत. ते NCERTची अधिकृत वेबसाईट ncert.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. तर 6 मे 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. या भरतीप्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.

NCERT Recruitment 2023
Viral News: काय सांगता? प्रवासादरम्यान चावला मच्छर, म्हणून खासदाराने चक्क थांबवली ट्रेन, नंतर...

असा करा अर्ज -

- सर्वात आधी उमेदवारांनी ncert.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

- त्यानंतर NCERT रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

- यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.

- फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

- त्यानंतर फी भरा आणि अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा.

- उमेदवारांनी फॉर्म डाउनलोड करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com