Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: भारतात EVM म्हणजे 'ब्लॅक बॉक्स', लोकशाहीचा फक्त दिखावा; मुंबईतील प्रकारानंतर राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi X Post On EVM: कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी ईव्हीएम मशीनला 'ब्लॅक बॉक्स' म्हटलं आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर चिंता व्यक्त केली आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर रविंद्र वायकरांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.

राहुल गांधींची पोस्ट काय?

भारतातील ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स'आहे. कोणालाही त्यांची छाननी करण्याची परवानगी नसल्याचं राहुल गांधींनी (Rahul Gandhi) म्हटलं आहे. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते, असं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातले आरोप होत आहेत, तर दुसरीकडे टेस्ला आणि एक्सचे मालक एलन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एक पोस्ट करत चिंता व्यक्त केली. एलन मस्क (Elon Musk) यांनी म्हटलंय, 'ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत. कारण मानवी हस्तक्षेपाने ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे.

एलन मस्क यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील घटनेचा दाखला (Ravindra Waikar Case) दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर (EVM Machine) प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT