Goa Congress leader Ketan Bhatikar, who was set to contest the by-election, tragically passed away after a snakebite near the Goa-Karnataka border. saam tv
देश विदेश

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Goa Congress Leader Ketan Bhatikar Snakebite Death News: गोवा काँग्रेसचे नेते आणि पोटनिवडणुकीचे उमेदवार केतन भाटीकर यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. गोवा-कर्नाटक सीमेवरील करमाळ घाट परिसरात ही घटना घडली असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

गोवा काँग्रेसचे नेते केतन भटिकर यांचे सर्पदंशाने निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. 38 वर्षीय केतन भाटीकर ही कारने कर्नाटकमधील दांडेली गावाकडे जात होते. गोवा कर्नाटक सीमेवरील करमाळ घाट परिसरात ते काही कारणास्तव वाहनातून खाली उतरले. याच दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केला. घटनेनंतर त्यांना तातडीने गोव्यातील धारबांदोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोटनिवडणुकीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात दिले होते आव्हान

केतन भाटीकर हे नुकतीच रद्द झालेली फोंडा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. मात्र हाय कोर्टाच्या (High Court) एका निर्णयामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली होती. भाटीकर यांनी हाय कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) विशेष अनुमती याचिका (SLP)दाखल केली होती. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

काँग्रेसच्या नेत्यांकडून शोक व्यक्त

भाटीकर यांच्या अचानक जण्याने गोव्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. युरी अलेमाओ ( विरोधी पक्षेनेते, गोवा विधानसभा): केतन भाटीकर यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. जनसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि कटिबद्धता नेहमीच स्मरणात राहील. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी: काँग्रेसने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. पक्षासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच आदराने स्मरणात ठेवले जाईल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशा भावना पक्षाने व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT