Congress leader Shakeel Ahmad Khan resigns after exit poll results indicate a possible defeat in Bihar. saam tv
देश विदेश

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Bihar Politics: बिहारमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलाय. ज्येष्ठ नेते शकील अहमद खान यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बिहारमध्ये राजकीय संकट आणखी तीव्र झालंय.

Bharat Jadhav

  • एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे अंदाज

  • शकील अहमद खान यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

  • राजीनाम्यामुळे बिहार काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्थिरतेचे संकेत.

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोल जाहीर झालेत. यात काँग्रेस पक्षाचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हा धक्का पचवत नाही तोच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला. बिहारमधील विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बिहार प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष शकील अहमद खान यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

शकील अहमद खान यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवलाय. त्यांनी पत्र लिहून राजीनामा देण्यामागील कारण देखील स्पष्ट केली आहेत. तुम्हाला आठवत असेल की, मी १६ एप्रिल २०२३ रोजी पक्षाला कळवले होतं की, मी भविष्यातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझे तीन मुले कॅनडामध्ये राहतात.

त्यापैकी कोणालाही राजकारणात येण्यात रस नाहीये, त्यामुळे तेही निवडणूक लढवणार नाहीत. मी आयुष्यभर काँग्रेस पक्षातच राहीन,ते आता शक्य दिसत नाही. जड अंतःकरणाने मी काँग्रेस पक्षातून राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं शकील अहमद खान यांनी आपल्या पत्रात लिहिलंय.

का दिला राजीनामा?

शकील अहमद खान यांनी आपण राजीनामा का दिला याचे कारण सांगितलंय. "पक्षाचा राजीनामा देण्याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जात आहे. माझा दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा कोणताही हेतू नाहीये.

माझ्या पूर्वजांप्रमाणे माझा काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि तत्त्वांवर विश्वास आहे. आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि तत्त्वांचा हितचिंतक आणि समर्थक राहीन. माझे शेवटचे मत देखील काँग्रेस पक्षाच्या बाजूने टाकने असा शकील अहमद यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

मतदानाआधी देणार होते राजीनामा

पुढे आपल्या पत्रात शकील अहमद खान म्हणातात की, त्यांच्या वडिलांनी पक्षात अनेक पदांवर काम केले होते. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर शकील अहमद खान यांनीही पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. काँग्रेसचे आमदार आणि खासदारही झाले. शकील अहमद खान हे आधीच पक्षाचा राजीनामा देणार होते. पण मतदान संपल्यानंतर त्यांनी आज जाहीर केलं. मतदानापूर्वी त्यांनी राजीनामा दिला असता तर पक्षात चुकीचा संदेश गेला असता, त्यामुळे त्यांनी मतदान संपल्यानंतर राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT